शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
बाबा 1 कोटी रुपये द्या, तरच...! 12 वर्षांच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात अजबच मागणी, CJI गवईंनी आईलाच सुनावलं!
4
एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा
5
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
6
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
7
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
8
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
9
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
10
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
11
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
12
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
13
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
14
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
15
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
17
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
18
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
19
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
20
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता

... हे तर नेमचेंजर सरकार!

By admin | Updated: June 9, 2016 05:45 IST

फुले यांचे नाव देण्याचा सरकारचा निर्णय हा अकारण वाद निर्माण करणारा असून हे तर खालच्या पातळीवरील राजकारण आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज केली.

मुंबई : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून त्यास महात्मा फुले यांचे नाव देण्याचा सरकारचा निर्णय हा अकारण वाद निर्माण करणारा असून हे तर खालच्या पातळीवरील राजकारण आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज केली. सरकार ‘गेमचेंजर’ नसून ‘नेमचेंजर’ असल्याची कोपरखळीही त्यांनी मारली. शासकीय योजनांना महात्मा फुले यांचे नाव दिलेच पाहिजे. त्यांच्या नावाला कोणीही आक्षेप घेण्याचा प्रश्न नाही, परंतु अगोदरपासून इतर एखाद्या नेत्याच्या नावाने सुरू असलेल्या योजनेला दुसऱ्या महापुरूषाचे नाव देणे अयोग्य आहे. भाजप सरकारला राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलायचे होतेच. त्यांनी महात्मा फुले यांचे नाव आणून विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुलेंचे नाव देता येईल, अशी एखादी चांगली योजना सुरू करायला सरकारला काय अडचण आहे? या आधी इंदिरा आवास योजनेचे नाव बदलण्यात आले. जीवनदायी योजनेला राजीव गांधी यांचेच नाव कायम ठेवावे यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)>कामत यांच्याशी संपर्क नाही>काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांच्या राजीनाम्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खा. चव्हाण म्हणाले की, आम्ही सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार गुरूदास कामत दिल्लीला गेले असून, त्यांची श्रेष्ठींशी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच यासंदर्भात अधिक प्रतिक्रि या देता येईल.>वसंतदादांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणारमाजी मुख्यमंत्री व थोर नेते वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. हे वर्ष संपूर्ण राज्यात साजरे करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने घेतल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. या वर्षामध्ये मुंबई व सांगली येथे दोन मोठे कार्यक्र म तर राज्यातील सर्व जिल्ह्यात वर्षभर विविध कार्यक्र म होतील. प्रदेश काँग्रेसने त्यासाठी आयोजन समिती स्थापन केली असून स्वत: चव्हाण अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कार्याध्यक्ष तर यशवंत हाप्पे हे समन्वयक आहेत.