शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनाला फटका नाही - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: January 28, 2017 21:51 IST

नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. २८ - गोव्यातील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पणजीत सभा घेत प्रचाराला प्रारंभ केला. दोन महिन्यांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदींवर टीका होत असतानाच त्यांनी हाच मुद्दा उचलून धरत नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगत आपल्या निर्णयाचे समर्थन केले. 'गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्यास गोवा देशातील सर्वोत्तम राज्य होईल' असे सांगत गोव्याला स्थिर सरकार द्या असे मोदी म्हणाले. गोवा विधानसभेसाठी येत्या चार फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या प्रचारार्थ आयोजिलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते
गोव्याने देशाला पर्रिकरांच्या रुपात संरक्षणमंत्री दिला आहे, सर्जिकल स्ट्राइकची चर्चा संपूर्ण देशात आहे असे सांगत मोदींनी मनोहर पर्रीकरांची स्तुती केली. तसेच विरोधकांवर टीकास्त्र सोडतानाच 'ज्यांचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही, ते निवडणुकीच्या रणांगणात का उतरले?' असा सवालही त्यांनी विचारला.
 
 केंद्रातील सरकार धाडसी असून ते धाडसी निर्णय घेत आहे. यापुढेही देशहितासाठी आम्ही धाडसी निर्णय घेत राहू. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील भ्रष्टाचारीच घाबरले; कारण सत्तर वर्षे त्यांनी जे काही लुटले ते केंद्र सरकार परत घेत आहे, असेही ते म्हणाले.  कर्नाटकमध्ये एका काँग्रेस मंत्र्याच्या घरी छापा पडला तेव्हा दीडशे कोटी रुपये रोख, नव्या नोटांच्या रूपात सापडले. तरी देखील त्या मंत्र्याविरुद्ध कर्नाटक सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. साधी नोटीसही त्याला पाठवली नाही. गोव्यात अशा प्रकारचे भ्रष्टाचारी जर लोकांना नको असतील तर लोकांनी भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत द्यावे. आपण येत्या पाच वर्षांत गोवा पूर्ण बदलून दाखवतो, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. ते म्हणाले, नोटाबंदीचा लाभ देशातील गरिबांना होईल. सामान्य लोकांना होईल. आता यापुढे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. तथापि, अर्थसंकल्प जाहीर होण्याअगोदरच काही विरोधक व काही कथित अर्थतज्ज्ञ अर्थसंकल्प कसा अपयशी आहे, बेकार आहे ते दाखवून देण्यासाठी प्रतिक्रिया व भाषणांचा मसुदा तयार करू लागलेत. त्यांची पूर्वतयारी अगोदरच सुरू झाली आहे. अर्थसंकल्पाच्या नावाने विरोधात बोलले की मग गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर आदी राज्यांमध्ये केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध चुकीचा संदेश जाईल, असे विरोधकांना वाटते.
गोव्याला राजकीय अस्थिरतेचा शाप आहे. अस्थिरतेमुळे यापूर्वीच्या काळात गोवा राज्य मागे राहिले. मात्र, आता गोव्याचा विकास एवढ्या चांगल्या प्रकारे होत आहे, की देशातील मोठ्या राज्यांना देखील त्यातून धडा शिकायला मिळत आहे, असे मोदी म्हणाले. या वेळी पर्रीकर व पार्सेकर यांचीही भाषणे झाली.