शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

नोटाबंदीचा देशावर परिणाम वाईट - शरद पवार

By admin | Updated: December 30, 2016 22:14 IST

चलन तुटवड्याचा वाईट परिणाम व्यवसाय, उद्योग, रोजगार, शेतकरी यांच्यासह समाजातील सर्व घटकांवर झाला आहे.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 30 - नोटाबंदी झाली खरी; परंतु चलन तुटवड्याचा वाईट परिणाम व्यवसाय, उद्योग, रोजगार, शेतकरी यांच्यासह समाजातील सर्व घटकांवर झाला आहे. यामुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली असून, याचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.वरवडे (ता. माढा) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण व नूतन इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील होते. प्रारंभी वरवडेतील विविध विकासकामांचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी सरपंच शोभा घाडगे, उपसरपंच नागनाथ पाटील, जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक प्रताप घाडगे, भारत गायकवाड, संजीव पाटील, सरोज पाटील, डॉ. गणेश ठाकूर, सीताराम गोसावी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नोटाबंदी होऊन पन्नास दिवस झाले तरी अजूनही बँकांसमोरील रांगा कमी होईनात. या रांगांमध्ये एकही धनवान दिसला नसून, सर्व गोरगरीब व सर्वसामान्य जनता दिसत आहे. मी ज्यावेळी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळी जिल्ह्यात भयानक दुष्काळी परिस्थिती होती. पूर्वी वरवडे या गावाचा तालुका मोडनिंब होते. मिरज संस्थानच्या काळात मोडनिंबला तालुक्याचा दर्जा होता. पुन्हा त्याचा माढा तालुका झाला. परंतु शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सतत माझ्यापुढे मांडणारे आ. गणपतराव देशमुख, भाई एस. एम. पाटील आहेत. भाई एस. एम. पाटील यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य गणेश ठाकूर यांनी केले. यावेळी माजी आ. एस. एम. पाटील, ए. डी. पाटील, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, डॉ. अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एक लाख रुपयांचा निधी संस्थेसाठी खा. शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमाला आ. गणपतराव देशमुख, आ. बबनराव शिंदे, आ. भारत भालके, माजी आ. विनायकराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, मनोहर डोंगरे, कल्याणराव काळे, माढा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास तोडकरी, जि. प. च्या माजी अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, उत्तम आवारी, शहाजी डोंगरे, कमलाकर महामुनी, प्राचार्य साहेबराव लेंडवे, अनिल पाटील यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.