शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता नाही, डॉक्टर नाही; वेळीच उपचार न मिळाल्याने गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 06:30 IST

शहापुरातील आदिवासी मुलाच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर/भातसानगर : शहापूर तालुक्यातील भवर पाडा येथील आठ वर्षीय ओमकार भवर याचा  वेळेत उपचार न झाल्याने मृत्यू झाला. गावात रस्ता नसल्याने पायपीट करत त्यास ठाणे वांद्रे येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टर नसल्याने त्याच्यावर उपचार झाले नाहीत. यामध्ये खूप वेळ वाया गेला. त्यानंतर त्यास शहापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. 

रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो दुसरीमध्ये शिक्षण घेत होता. रात्री झोपेत असताना तो रडायला लागला आणि तोंडातून फेस आला म्हणून त्याला अघई येथील रुग्णालयात नेण्यात आले. 

त्याचे पालक त्याला घेऊन जाण्यासाठी भवरपाडा येथून निघाले. परंतु, गावात रस्ता नसल्याने अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ वांद्रे या गावापर्यंत येण्यासाठी लागला. रुग्णालयात पोहोचण्यासाठी किमान पाऊण तास असा उशीर झाल्याने या आदिवासी मुलाचा मृत्यू झाला. यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जाधव यांनी सांगितले की, मुलाच्या फुफ्फुसात रक्तस्राव झाला होता. तसेच याआधी इन्फेक्शन झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 

वांद्रे आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थितवांद्रे आरोग्य केंद्रावर पोहोचल्यानंतर तेथे कोणीच  वैद्यकीय अधिकारी नव्हते. मुक्कामी वैद्यकीय अधिकारी  राहत नसल्याने मुलाला  १३ किमी अंतरावरील अघई  प्राथमिक आरोग्य केंद्रावर दुचाकीवरून नेले. तोपर्यंत पहाटेचे तीन ते चार वाजून गेले होते. त्याला एकदा उलटी झाली आणि तोंडातून फेस निघत होता. अघई येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. प्रकृती चिंताजनक झाल्याने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. सकाळचे साडेपाच वाजून गेले होते.