शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वरणभात नाही, बिस्कीट नाही की चाॅकलेटही नाही; जन्मापासून फक्त दुधावरच जगतोय १७ वर्षांचा ‘भुजंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 07:33 IST

वडील गुरुदास व आई सुनीता दोघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

ठळक मुद्देआई-वडील मोलमजुरी करतात; पण गावखेड्यात रोज काम मिळेलच असे नाही. पैशांअभावी अनेकदा भुजंगला दूध मिळत नाही. तेव्हा त्याला रात्री उपाशीपोटी झोपावे लागतेभुजंगला शाळेतही घातले आहे. पहिली ते सातवीचे शिक्षण जामखुर्द येथेच झाले.

पी. एस. गोरंतवारपोंभुर्णा (जि. चंद्रपूर) : वरणभात सोडा, साधे बिस्कीटही न खाता कुणी फक्त दूध पिऊन जगू शकतो का? आश्चर्य आहे खरे; पण सत्यही आहे. जन्मापासून ते आज वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत तो फक्त दूध आणि दूधच पिऊन जगतो आहे. पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील भुजंग गुरुदास मडावी असे त्याचे नाव आहे. गावकरी त्याला ‘आऊ’ म्हणतात.

भुजंगचा जन्म २३ ऑगस्ट २००५ रोजी झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील गुरुदास व आई सुनीता दोघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सामान्यपणे जन्मलेला भुजंग मात्र असामान्य अनुभव देत होता. जन्मानंतर तब्बल १२ दिवस त्याने डोळेच उघडले नव्हते. शिवाय आईचे दूधही प्यायला नाही. बरीच खटपट झाली. शेवटी तेराव्या दिवशी भुजंगने डोळे उघडले व आईचे दूध प्यायला. कुटुंब चिंतामुक्त झाले.

भुजंग सहा महिन्यांचा झाल्यानंतर वरणभात व खिचडी खाऊ घालण्याचा प्रयत्न सुरू झाला; पण अन्नाचा एक कणही त्याने तोंडात घेतला नाही. भूक लागली की, तो फक्त दुधासाठी किंचाळत असे. डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. उपचारही झाले. मात्र, उपयोग झाला नाही. सर्व तपासण्याअंती तो फिट आढळून यायचा. भुजंगची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टर सांगत. सहा वर्षांपर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते. आज भुजंग १७ वर्षांचा आहे. दूध हाच त्याचा आहार. पावशेर सकाळी, एक पावशेर संध्याकाळी. 

अनेकदा झोपतो उपाशीपोटीआई-वडील मोलमजुरी करतात; पण गावखेड्यात रोज काम मिळेलच असे नाही. पैशांअभावी अनेकदा भुजंगला दूध मिळत नाही. तेव्हा त्याला रात्री उपाशीपोटी झोपावे लागते; पण तो आई-वडिलांकडे तक्रार करीत नाही. वृद्ध आई-वडिलांचे दारिद्र्य त्याला कळते.

शिक्षण म्हणजे वहीवर रेषाभुजंगला शाळेतही घातले आहे. पहिली ते सातवीचे शिक्षण जामखुर्द येथेच झाले. आठवीपासून तो देवाडा खुर्द येथील राष्ट्रमाता विद्यालयात शिक्षण घेतो. यावर्षी दहावीत आहे. भुजंगचे शिक्षण म्हणजे वहीवर रेषा ओढून घेणे. शिक्षणाचा संपूर्ण सार तो आपल्या रेषांमध्ये शोधतो. शिक्षकांच्या प्रत्येक शिकवणीत तो ध्यानस्थ बसून असतो. त्याला लिहिता, वाचता, बोलता येत नाही. मात्र, बोललेले सर्व कळते. तो शाळेला ‘बेलम’ व पैशाला ‘खुणाल’ म्हणतो.