शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणमध्ये मराठा कोट्यातून आरक्षण नाही; एसईबीसी आरक्षण प्रकरणी कोर्टाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 06:40 IST

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या वैधतेचा मुद्दा प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारने तात्पुरता उपाय म्हणून  ३१ मे २०२१ रोजी अधिसूचना काढत एसईबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवारांना  ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ घेण्याची परवानगी दिली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महावितरणमध्ये नोकरीसाठी मराठा कोट्यातून (एसईबीसी)  अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही. निवड प्रक्रियेच्या मध्येच प्रवर्ग बदलण्याची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मनमानी व अन्यायकारी आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने या प्रकरणी सरकारी अधिसूचना पूर्वलक्षित प्रभावाने लागू होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.

राज्य सरकारची ३१ मे २०२१ची अधिसूचना पूर्वलक्षित प्रभावाने लागू करून मराठा कोट्यातील पात्र उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून नोकरीचा लाभ देण्याचा महावितरणचा निर्णय मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने शुक्रवारी रद्द केला. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, महावितरणने ऑगस्ट, २०१९मध्ये नोकर भरतीसाठी अर्ज मागविण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात ईडब्ल्यूएस व एसईबीसीसाठी स्वतंत्र आरक्षण असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच मराठा आरक्षणाच्या वैधतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचेही नमूद करण्यात आले होते. त्यामुळे एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांची निवड ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असेल, याचाही जाहिरातीत उल्लेख होता. 

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या वैधतेचा मुद्दा प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारने तात्पुरता उपाय म्हणून  ३१ मे २०२१ रोजी अधिसूचना काढत एसईबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवारांना  ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण रद्द केले. मात्र, महावितरण कंपनीने राज्य सरकारच्या अधिसूचनेचा अन्वयार्थ असा लावला की, एसईबीसी प्रवर्गातील जे पात्र उमेदवार आहेत, त्यांना एसईडब्ल्यू प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्तीसाठी विचारात घेतले जाऊ शकते. सरकारच्या अधिसूचनेच्या आधारावर महावितरण कंपनीने घेतलेला निर्णय बेकायदेशीर व कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आहे, असे खंडपीठाने म्हटले. 

‘निवड प्रक्रियेच्या मध्येच प्रवर्ग बदलण्याची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मनमानी व अन्यायकारी आहे. निवड प्रक्रियेसाठी पूर्वलक्षित प्रभावाने अधिसूचना जारी करण्याची प्रतिवादींची (राज्य सरकार, महावितरण) बेकायदेशीर आणि कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आहे’, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.

टॅग्स :mahavitaranमहावितरण