शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

‘ना हरकत दाखला’ अट शिथिल केल्याने दिलासा

By admin | Updated: November 3, 2016 01:41 IST

५० मीटरच्या पुढील अंतरावरील खासगी जागांवरील बांधकाम व मिळकती दुरुस्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्राची अट संरक्षण मंत्रालयाने शिथिल केली

देहूरोड : केंद्रीय संरक्षण विभागाच्या विविध ठिकाणच्या आस्थापनां लगतच्या ५० मीटरच्या पुढील अंतरावरील खासगी जागांवरील बांधकाम व मिळकती दुरुस्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्राची अट संरक्षण मंत्रालयाने शिथिल केली आहे. मात्र, याचा देहूरोड दारूगोळा कोठाराच्या संरक्षित क्षेत्रातील (रेड झोन) खासगी जागांवर बांधकाम करण्यासाठी अगर येथील जुन्या इमारती दुरुस्ती करण्यासाठी काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे रेड झोनचा गेले १४ वर्षे प्रलंबित प्रश्न कधी मार्गी लागणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. संरक्षण विभागाने ना हरकत प्रमाणपत्राची अट कोणत्या लष्करी आस्थापनांसाठी शिथिल केली याबाबतची माहिती प्रसिद्ध करून बांधकामांना परवानगी मिळण्याबाबतचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे. संरक्षण विभागाने बांधकामांबाबत जारी केलेल्या या आदेशाचा देहूरोड दारुगोळा कोठाराच्या रेडझोनच्या दोन हजार यार्ड बाधित क्षेत्रातील चिंचोली, किन्हई, तळवडे, किवळेतील विकासनगर आदी भागातील नागरिकांना काहीही उपयोग होणार नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर इतर भागातील कोणत्या लष्करी आस्थापनापासून १० मीटर व ५० मीटर अंतराचे पुढे ना हरकत पत्र घ्यावे लागेल हे निश्चित सांगता येईल, असे त्यांनी नमूद केले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या गेल्या वर्षी जानेवारीत झालेल्या निवडणुकीपूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी पुण्यातील बैठकीत देहूरोड दारुगोळा कोठाराची रेडझोन हद्द दोन हजार यार्डावरून ५५० यार्डपर्यंत कमी करण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, त्या वेळी देहूरोड रेडझोन संघर्ष समितीने ५५० यार्डपर्यंत हद्द कमी करून उपयोग होणार नसल्याचे उपलब्ध कागदपत्रांसह निदर्शनास आणून दिले होते. तसेच रेडझोन हद्द किती असावी याबाबतची माहिती अधिकारात संरक्षण मंत्रालयाकडून मिळविलेली सर्व माहिती संरक्षण मंत्र्यांच्या सचिवांकडे देण्यात आली होती. केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेवर येऊन अडीच वषो होत आली व राज्यातील भाजपा सरकार सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली. मात्र, अद्यापही केंद्र व राज्य सरकार पातळीवर गेल्या २१ महिन्यांत देहूरोड रेडझोनबाबत बाधित शेतकरी, ग्रामस्थ व संघर्ष समितीसह एकही संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले नसल्याने रेडझोनचा प्रश्न नक्की कधी मार्गी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर) >लष्करी आस्थापनांची यादी जाहीर करून संभ्रम दूर करण्याची मागणी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने १२ वर्षांपूर्वी २६ डिसेंबर २००२ रोजी डिफेन्स वर्क्स कायद्याप्रमाणे (१९०३) एक अधिसूचना काढून देहूरोड दारूगोळा कोठाराच्या बाहेरील संरक्षित क्षेत्रापासून (कोठाराच्या संरक्षक लोखंडी तारेच्या बाहेरील कुंपणापासून) दोन हजार यार्ड अंतरापर्यंत इमारती अगर अन्य अडथळ्यांपासून जमीन मोकळी ठेवावी, असे नमूद केलेले आहे. त्यामुळे दोन हजार यार्डच्या भागात कोणतेही बांधकाम करण्यासाठी प्रथम रेडझोनचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत निर्णय होत नसल्याने सर्वच थरांत नाराजी आहे. या भागातील नागरिकांच्या निवासाचा मोठा प्रश्न भेडसावत असून, विकासाचा मार्ग खुंटला आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर रेडझोनची टांगती तलवार असल्याने हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या मुलांचे लग्न जुळविताना अनेक अडचणी येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.