शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

शरद पवार यांना नोटीस देण्याचे निर्देश नाहीत; निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 06:40 IST

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रासंदर्भात प्राप्तिकर विभागाने नोटीस दिली आहे, असे पवार यांनी मंगळवारी म्हटले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत नोटीस जारी करण्यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) कोणतेही निर्देश दिले नाहीत, असे निवडणूक आयोगाने बुधवारी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रासंदर्भात प्राप्तिकर विभागाने नोटीस दिली आहे, असे पवार यांनी मंगळवारी म्हटले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवेदन जारी करीत उपरोक्तपणे स्पष्टीकरण दिले आहे. निवडणुकीत दाखल केलेल्या काही निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत प्राप्तिकर विभागाने स्पष्टीकरण आणि उत्तर मागावले आहे, असे पवार यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. मला काल नोटीस आली. सर्व सदस्यांपैकी आमच्याबद्दलच केंद्राची ‘प्रेमाची भावना’ यातून दिसते. त्याबद्दल आनंद आहे, असा टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला होता. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून प्राप्तिकर विभागाने दिलेल्या नोटीसला लवकरच उत्तर देणार आहे, असेही पवार यांनी म्हटले होते. निवडणूक आयोगाने निवेदन जारी केले आहे. निवडणूक आयोगाने पवार यांना नोटीस देण्यासाठी सीबीडीटीला निर्देश दिले नाहीत, असे आयोगाने यात नमूद केले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगIncome Taxइन्कम टॅक्स