शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग जमीन खरेदीची चौकशीच नाही; पृथ्वीराज चव्हाण संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 03:36 IST

खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा एकनाथ शिंदेंकडून इन्कार

मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची अंतिम अधिसूचना निघण्यापूर्वी या महामार्गालगत, राजकीय नेते, मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी वा त्यांच्या नातेवाइकांनी केलेल्या जमीन खरेदीची चौकशीच न केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत संताप व्यक्त केला. अधिसूचनेनंतरच्या जमीन खरेदीची चौकशी लोकायुक्तांमार्फत करण्यात आली होती आणि त्यात कुठलाही गैरव्यवहार आढळला नाही, असे सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचाराच्या मुद्यावरून विरोधक सभागृहात प्रचंड गदारोळ करत असतानाच या समृद्धीच्या प्रश्नावर चर्चा झाली आणि गदारोळातच प्रश्न गुंडाळला गेला. मात्र, त्या आधी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की अधिकारी वा त्यांच्या नातेवाइकांनी समृद्धीलगत जमिनीची खरेदी केल्यानंतर अंतिम अधिसूचना काढण्यात आली आणि याच लोकांनी मग शासनाकडून जमिनीचा चौपट मोबदला घेतला.हा घोटाळा मोठा असून त्या बाबत चौकशीची मागणी आपण तत्कालिन मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्या बाबतचे पुरावेदेखील दिलेले होते; पण नेमकी तीच चौकशी झाली नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला.विरोधकांचा गदारोळ; चव्हाण हतबलखुल्या बाजारातून ७.३% व्याजदराने कर्ज उपलब्ध होत असताना या प्रकल्पासाठी ९.७५% दराने कर्ज घेणार असल्याने वाढीव दराने कर्ज घेण्याची नेमकी कारणे काय अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मात्र, शिंदे यांनी हे खरे नसल्याचे सांगत कर्जावर असलेला व्याजदर प्रचलित दरापेक्षा किफायतशीर असल्याचा दावा उत्तरात केला. विरोधकांच्या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास संपल्याने चव्हाण यांना त्यांचा प्रश्न रेटताच आला नाही.समृद्धी महामार्गाच्या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विधान भवनात समोरासमोर भेट झाल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून नमस्कार केला.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणEknath Shindeएकनाथ शिंदे