शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

संकेतस्थळावर शुल्क नाही; राज्यातील ४५० महाविद्यालयांना नोटीस; नियम न पाळल्याने कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 08:08 IST

शुल्क नियामक प्राधिकरणाने ही (FRA) नोटीस बजावली आहे

अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: संकेतस्थळावर शुल्क जाहीर न करणाऱ्या राज्यातील ४५० महाविद्यालयांना शुल्क नियामक प्राधिकरणाने (एफआरए) नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे.

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रत्येक महाविद्यालयाला त्यांचे शुल्क संकेतस्थळावर जाहीर करावे लागते. मात्र महाविद्यालये ते जाहीर न करता विद्यार्थ्यांकडून मनमानी पद्धतीने एफआरएने ठरवून दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त मोठ्या रकमेची आकारणी करत असल्याचे समोर आले. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी त्यांचे शुल्क संकेतस्थळावर जाहीर करण्याचे निर्देश एफआरएने दिले होते. त्याबाबतचे पत्र पाठविले होते. मात्र एफआरएच्या या नियमांना केराची टोपली दाखवून त्यांनी शुल्क जाहीर केले नव्हते. 

याबाबत एफआरएने तब्बल ६२८ महाविद्यालयांच्या संकेतस्थळांची तपासणी केली होती. त्यातील केवळ १०३ महाविद्यालयांनी त्यांचे शुल्क जाहीर केले होते. तर तब्बल ४५० महाविद्यालयांनी शुल्क जाहीर केले नव्हते. तर इतर शुल्क ७५ संस्थांनी जाहीर केले नव्हते. त्यानंतर या महाविद्यालयांना नोटीस बजावून कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा एफआरएने केली होती. त्यावर खुलासा सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान, यावर २९ महाविद्यालयांनी कोणताही खुलासा सादर केला नाही. तर अन्य महाविद्यालयांनी खुलासा एफआरएला मिळाला आहे. आता त्याची पडताळणी केल्यानंतर कारवाई केली जाणार आहे.

कारवाईचा निर्णय ऑथोरिटी घेणार

२९ महाविद्यालयांनी उत्तर दिले नाही. तर महाविद्यालयांनी त्यांचे म्हणणे सादर केले आहे.  ऑथोरिटीकडून अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर त्यांच्या निर्णयानुसार महाविद्यालयांवर कारवाईचा प्रस्ताव आहे, अशी माहिती एफआरएचे सचिव डॉ. अर्जुन चिखले यांनी दिली. कारवाईला विलंब केल्याने  दोन वर्षे विद्यार्थी आणि सरकारची लूट झाली. यापुढे तक्रारीवर कारवाई करण्याची कालमर्यादा निश्चित व्हायला हवी, अशी मागणी मुक्ता या प्राध्यापक संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुभाष आठवले यांनी केली.

टॅग्स :collegeमहाविद्यालय