शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ना इंजिनीअर, ना एस्टिमेट, आदिवासींनीच बांधला ६० मीटर लांबीचा नाल्यावर पूल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 07:11 IST

भामरागडच्या दुर्गम भागात लोक रस्ते, पुलांअभावी विविध समस्यांना तोंड देत असतात. आदिवासीबहूल दुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात घनदाट जंगल आहे.

श्यामराव येरकलवारलाहेरी (जि. गडचिरोली) : पावसाळ्यात उर्वरित जगाशी संपर्क बंद पाडणाऱ्या नाल्यावर पूल बांधून द्यावा, यासाठी सरकारदरबारी अर्ज-विनंत्या केल्या. सरकार पूल बांधून देत नाही म्हणून किती दिवस अडचणी झेलत राहायचे? अखेर आपली समस्या आपणच सोडवायची, असा निर्धार करत त्यांनी त्या खळखळ वाहणाऱ्या नाल्यावर लाकडी पाट्यांचा मजबूत पूल तयार करून घेतला. ना कुणी अभियंता, ना एस्टिमेट. आदिवासीच अभियंता झाले आणि आपल्या कल्पकतेतून त्यांनी पूल साकारला.

भामरागडच्या दुर्गम भागात लोक रस्ते, पुलांअभावी विविध समस्यांना तोंड देत असतात. आदिवासीबहूल दुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात घनदाट जंगल आहे. या भागात पाऊसही जास्त पडतो. त्यामुळे पावसाळ्यात डोंगरदऱ्यातून ओसंडून वाहणाऱ्या नदी, नाल्यांमुळे पैलतीरावरील गावांचा संपर्क तुटतो. गुंडेनूर नाल्यावर पूल नसल्यामुळे या गावातील नागरिक मागील ६ वर्षांपासून पावसाळ्यात बांबूपासून ताटवे बनवून पूल तयार करायचे. पाण्याचा प्रवाह चांगला असेपर्यंत ते टिकून राहात. त्यामुळे यावर्षी नवीन प्रयोग करत बांबूऐवजी लाकडी पाट्यांचा पूल गावकऱ्यांनी बनविला. जवळपास ६० मीटर लांबीचा हा पूल बांबूच्या पुलापेक्षा मजबूत आहे.

दरवर्षीची कसरत, पक्का पूल हवागुंडेनूर नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नदी पार करणे अशक्य होऊन एका गर्भवतीला प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे शासनाने पूल बनवून द्यावा म्हणून रडगाणे गात बसण्याऐवजी श्रमदान करून स्वत:च आपली समस्या दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, नागरिकांनी शोधलेला हा उपाय कायमस्वरुपी नाही. दरवर्षी त्यांना ही कसरत करावी लागते. नाल्यावर पक्का पूल तयार करून दिल्यास बिनागुंडा परिसरातील अनेक गावांचा भामरागडशी बारमाही संपर्क राहील.