शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

बँकेत ई-मेल आयडीची सक्ती नको

By admin | Updated: September 22, 2016 20:32 IST

बँकांनी ग्राहकांना ई-मेल आयडी देण्याची सक्ती करू नये यासाठी एका वृद्ध दाम्पत्याने लिहिलेल्या पत्राची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका म्हणून दखल घेतली आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २२ : बँकांनी ग्राहकांना ई-मेल आयडी देण्याची सक्ती करू नये यासाठी एका वृद्ध दाम्पत्याने लिहिलेल्या पत्राची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका म्हणून दखल घेतली आहे. प्रभाकर व प्रमिला किन्हेकर असे व्यथित दाम्पत्याचे नाव असून ते सीताबर्डी येथील रहिवासी आहेत. पत्रातील माहितीनुसार, त्यांचे युको बँकेत बचत खाते आहे. तसेच, त्यांनी काही रकमेची मुदत ठेव ठेवली आहे. त्यांचे उत्पन्न करपात्र नाही. यामुळे त्यांनी गेल्या एप्रिलमध्ये बँकेला १५एच अर्ज भरून दिला. बँकेच्या अधिकाऱ्याने आवश्यक बाबी तपासून अर्ज ठेवून घेतला. आता त्यांना ई-मेल आयडी मागण्यात आला आहे. ई-मेल आयडी नसल्यास अर्ज अपूर्ण समजून व्याजावर टीडीएस कपात करण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे.

यामुळे हे दाम्पत्य अडचणीत सापडले आहे. ई-मेल आयडी हे काय उपकरण आहे हे आपल्याला माहीतच नसल्याचे व हे उपकरण खरेदी करण्याची आपली ऐपत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ई-मेल आयडीला उपकरण संबोधून त्यांनी याबातची अनभिज्ञता स्पष्ट केली आहे. याप्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. अनिल किलोर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली. तसेच, त्यांना यासंदर्भात दोन आठवड्यांत नियमानुसार याचिका सादर करण्याचे निर्देश दिलेत.