शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 08:46 IST

E Bike Taxi in Maharashtra: मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.

मुंबई : राज्य परिवहन विभागाने ई-बाइक टॅक्सी सेवेसाठी तयार केलेल्या नियमावलीवर नागरिकांनी ८५ सूचना-हरकती नोंदवल्या आहेत. त्यात ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करू नका, अशी मागणी करण्यात आली आहे. या हरकती-सूचना सरकारकडे पाठवल्या आहेत. 

मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सुरू करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी नियम तयार केले आहेत. त्या नियमावलीवर ५ जूनपर्यंत  हरकती मागविल्या होत्या. हरकतींपैकी १० संघटना, ८० हून अधिक नागरिकांनी हरकती नोंदविल्या.  त्यात ही सेवा सुरू न करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रिक्षाचालकांच्या रोजगारावर गदा?

मुंबई महानगर प्रदेशातील अनेक रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनीही या सेवेला विरोध केला आहे. त्यांच्या मते, या सेवेमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतील, तसेच रिक्षाचालकांच्या रोजगारावरही गदा येण्याची शक्यता आहे. 

निर्णयाकडे लक्ष 

देशातील १२ राज्यांमध्ये सध्या ही सेवा सुरू आहे. मात्र, कर्नाटकमध्ये काही अडचणींमुळे ती तात्पुरती थांबवण्यात आली आहे. त्यामुळे विविध राज्यांतील अनुभवाचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नियम तयार केले आहेत. 

असे असले तरी या सेवेला राज्यात वाढत विरोध पाहता यावर सूचना आणि हरकतींवर काय निर्णय घेण्यात येणार, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Taxiटॅक्सीMumbaiमुंबईRto officeआरटीओ ऑफीसpratap sarnaikप्रताप सरनाईक