रोहा : णारे तटकरे यांनाच केंद्रात जायचे नव्हते, असे त्यांनी या वेळी निवडणुकीच्या केलेल्या व्यूहरचनेवरुन आणि राबविलेल्यापक्ष जी काही जबाबदारी देईल, ती आपण स्वीकारु, असे सदैव सांग प्रचार यंत्रणेवरुन दिसून आले आहे. प्रत्येक निवडणुकीत तटकरेंची अव्वल दर्जाची मॅनेजमेंट असायची. यंदाच्या वेळी तटकरेंची ती मॅनेजमेंट इतरांना सोडाच मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कुठे दिसून आली नसल्यानेच कदाचित हा पराभव ओढवला, असा सूर या वेळी कार्यकर्त्यांमधूनच निघू लागला आहे. निवडणूक काळात कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांच्या सतत संपर्कात राहणे हा सुनील तटकरेंचा हातखंडा होता. तोच या निवडणुकीत कुठे पाहायला मिळाला नाही. रोहा तालुक्यापुरते सांगायचे झाले तर कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, ही पहिली निवडणूक आहे, जिथे तटकरेंनी आमच्याशी कुठल्याच प्रकारचा संपर्कच ठेवला नव्हता. अन्यथा ते निवडणुकीला उभे राहिले की प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचा अथवा त्यांच्या निकटवर्तीयांचा संपर्क झाला नाही, असे आजवर घडले नव्हते. निवडणूक मतदानाच्या एक दोन दिवस आधी ते कार्यकर्त्यांसोबत अधिक सक्रिय झाले. यापूर्वी मतदानाच्या दिवशीही भल्या पहाटेपासून स्वत: किंवा त्यांच्या पी.ए. मार्फत ते संपर्कात राहून विविध सूचना द्यायचे. निवडणूक मतदान झाल्यावर दुसर्या दिवशी प्रत्येक बुथची परिस्थिती ते स्वत:हून जाणून घ्यायचे. त्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना सुतारवाडी येथे ते स्वत: फोन करुन बोलवित, मात्र यंदा तसे काहीही घडलेले नाही. तटकरे निवडणुकीला उभे आहेत की नाही आणि असले तरी मनापासून नसावेत म्हणूनच या निवडणुकीत गोंधळ उडाला आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असावे, अशी येथील कार्यकर्त्यांची धारणा बनली आहे. तटकरेंना राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्रिपद सोडून केंद्रात जाणे पसंत नव्हते. खासदारकीची उमेदवारी नको, असे पक्षाचे नेते शरद पवार यांना सांगण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते आणि तशी परिस्थितीही नव्हती. आपण निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्टा करीत असल्याचा आभास त्यांनी निर्माण केला होता. यासाठीच आजवर कुठल्याही निवडणुकीत कधी नव्हे ते शरद पवारांच्या दोन सभा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते अगदी अख्खा मंत्रिमंडळ आणि सुप्रिया सुळेंनाही त्यांनी रायगडमध्ये आपल्या प्रचारासाठी आणले आणि तसा आभास का असेना तो निर्माण करण्यात त्यांना मात्र यशही आले.
तटकरेंची ‘ती’ मँनेजमेंट या वेळी दिसलीच नाही!
By admin | Updated: May 17, 2014 00:46 IST