शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार महाराष्ट्राच्या राजकारणात, कपिल पाटील यांच्याकडे सूत्रे

By admin | Updated: February 7, 2017 09:33 IST

बिहारच्या राजकारणातील चाणक्य मानले जाणारे नितीश कुमार लवकरच आपला पक्ष जनता दल युनायटेड (जदयु) चा विस्तार महाराष्ट्रात करणार आहेत

नामदेव कुंभारमुंबई, दि. 7 - बिहारच्या राजकारणातील चाणक्य मानले जाणारे नितीश कुमार लवकरच आपला पक्ष जनता दल युनायटेड (जदयु) चा विस्तार महाराष्ट्रात करणार आहेत. मुंबई शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी लोकभारती पक्षाचे जदयुमध्ये विलीनिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. जदयुमध्ये लोकभारती पक्षाचे विलीनीकरण कार्यक्रमास स्वत: नितिश कुमार महाराष्ट्रात येणार आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकभारती पक्षाचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी काही दिग्गज नेत्यांसह पाटण्यातल्या मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन नितीश कुमारांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी पक्ष विलीनीकरणाचा निर्णय घेतला. याची औपचारिक घोषणा ११ फेब्रुवारीला रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत होणार आहे. या बैठकीत बिहारचे काही ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज साहित्यिक, लेखक, पत्रकार, शिक्षणक्षेत्राशी संबंधित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आमदार कपिल पाटील यांचे शिक्षण क्षेत्रावरचे काम पाहता व विधानपरिषदेतील लढवय्या आमदार म्हणून त्यांच्याकडे संपुर्ण महाराष्ट्र पाहतो. जदयुची महाराष्ट्रातील सर्व सुत्रे कपिल पाटील यांच्याकडे जाणार आहेत.  कपिल पाटील यांच्या रुपाने जदयुला महाराष्ट्रात कणखर नेतृत्व मिळाले आहे. यामुळे महाराष्ट्रात जनता दलाच्या रूपात नवीन पर्याय उभा राहण्याची शक्यता आहे. जदयुमध्ये त्यांच्या जाण्याने भविष्यात एक नविन पर्याय महाराष्ट्रात उभा राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

नीतीश कुमार कुठल्या मोठ्या जाती समूहातले नाहीत. जातीची व्होट बँक त्यांच्या मागे नाही. ते ज्या कुणबी (कुर्मी) समाजातले आहेत तो समाज फक्त 3टक्के आहे. मात्र विचाराने पक्के लोहियावादी, समाजवादी असलेले नीतीशकुमार आज बिहारचे सर्वमान्य नेता आहेत.