शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्याची तयारी जोमात

By admin | Updated: May 23, 2017 03:24 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गडकरी हे २७ मे रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त कस्तूरचंद पार्कवर त्यांचा भव्य सत्कार होणार असून त्यात सर्वपक्षीय नेते व देशातील विविध क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत.गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आध्यात्मिक संत श्री श्री रविशंकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, भाजपाचे राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी, सिने कलावंत आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नितीन गडकरी षष्ट्यब्दीपूर्ती गौरव समारोह समितीचे कार्याध्यक्ष आहेत. ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे संयोजक व वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी हे सहसंयोजक आहेत. सुरुवातीला गडकरी यांचा स्थानिक स्तरावर सत्कार करण्याचा निर्णय नागपुरातील नेत्यांनी घेतला होता. मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावण्यात येणार होते. संबंधित नेते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा फडणवीस म्हणाले, नितीन गडकरी हे आपल्या सर्वांचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा वाढदिवस हा स्थानिक स्तरावर न होता, तो भव्यदिव्य असाच झाला पाहिजे. त्या कार्यक्रमाला मी प्रमुख अतिथी म्हणून नव्हे तर आयोजकाच्या भूमिकेत राहील, असेही त्यांनी सांगितले. त्यातून सोहळ््याची रूपरेषा ठरली.