शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत मोठा ‘वाहन टोइंग’ घोटाळा, मुख्यमंत्र्यांच्या सचिवांचे लागेबांधे : निरूपम यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 13:50 IST

मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण दराडे यांच्या मर्जीतील विदर्भ इन्फोटेक कंपनीला नियमबाह्य पद्धतीने मुंबईतील वाहनांच्या टोइंगचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण दराडे यांच्या मर्जीतील विदर्भ इन्फोटेक कंपनीला नियमबाह्य पद्धतीने मुंबईतील वाहनांच्या टोइंगचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. विदर्भ इन्फोटेकला फायदा मिळावा म्हणून टोइंगचे दर वाढविण्यात आले असून छोट्यामोठ्या कारणांवरून वाहनचालकांवर ‘टोइंग’धाडी टाकण्यात येत असल्याचा दावा निरूपम यांनी केला.निरूपम म्हणाले, नागपूरस्थित विदर्भ इन्फोटेक कंपनीचे मालक प्रशांत उगेमुग आणि आयएएस अधिकारी प्रविण दराडे यांच्यातील संबंधांची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी व्हायला हवी. दराडे ज्या विभागात जातात त्या विभागातील कामे विदर्भ इन्फोटेकला मिळतात. शिवाय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून या कंपनीला अनेक सरकारी कामे मिळाली. कम्युटर प्रोग्रॅमिंगशी संबंधित असणा-या विदर्भ इन्फोटेकला कसलाच अनुभव नसताना टोर्इंगचे कंत्राट देण्यात आले, असा आरोप निरूपम यांनी केला.सध्या टोळधाडीप्रमाणे या कंपनीच्या ८० हायड्रोलिक मशीनच्या टोर्इंगव्हॅन मुंबईभर फिरत आहेत. विदर्भ इन्फोटेकला फायदा मिळावा यासाठी दंडाची रक्कम चारचाकीसाठी ६६० आणि दुचाकीसाठी ४२६ करण्यात आली. टो केलेल्या एका चारचाकीमागे या कंपनीला चारशे रूपये मिळतात. दंडातील मोठी रक्कम विदर्भ इन्फोटेकच्या खात्यात जमा होते. त्यामुळेच मुंबईकरांवर सध्या ‘टोइंग’च्या धाडीच पडत असल्याचा आरोप संजय निरूपम यांनी केला.आरोप बिनबुडाचे - मुख्यमंत्री कार्यालयटोईंग व्हॅन प्रणालीच्या कंत्राट प्रक्रियेशी मुख्यमंत्री कार्यालय किंवा प्रवीण दराडे यांचा काहीही संबंध नाही, असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. कंत्राट देण्याची कार्यवाही सहआयुक्त, मुंबई वाहतूक पोलिसांच्या पातळीवरच निश्चित करण्यात आली. त्यांनी केपीएमजी या संस्थेची टेक्निकल कन्सल्टिंग एजन्सी म्हणून नियुक्ती केली होती.या संस्थेने अल्ट्रा मॉडर्न हायड्रॉलिक क्रेन्ससाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल तयार करून दिले आणि त्याआधारावरच मुंबई वाहतूक पोलिसांनी ई-टेंडरिंगची प्रक्रिया राबविली.या कंपनीने एकाच दरावर सर्वाधिक कमी ७ वर्षांचा कालावधी नमूद केल्याने त्यांना हे काम मे २०१६ मध्ये देण्यात आले. या कंपनीला आघाडी सरकारच्या काळात, तसेच मुंबई, ठाणे पालिकेत तर काँग्रेसचे महापौर असताना नागपुरात कंत्राट देण्यात आल्याचे खुलाश्यात म्हटले आहे.

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस