शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

एनआयआरच्या रिक्त जागा माफ सू भरणार

By admin | Updated: June 16, 2014 20:06 IST

अनिवासी भारतीय (एनआयआर) व भारतीय पशुवैद्यक (व्हीसीआय) परिषदेच्या कोट्यातील रिक्त जागेवर महाराष्ट्र पशुविज्ञान (माफसू) विद्यापीठाकडून पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आता स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

अकोला : अनिवासी भारतीय (एनआयआर) व भारतीय पशुवैद्यक (व्हीसीआय) परिषदेच्या कोट्यातील रिक्त जागेवर महाराष्ट्र पशुविज्ञान (माफसू) विद्यापीठाकडून पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आता स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी माफसूने विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत ठराव पारित करू न घेतला आहे.

दरम्यान, पदवी अभ्यासक्रमासाठी माफसूतर्फे ऑनलाईन प्रवेश स्वीकारणे सुरू झाले असून, एकही जागा रिक्त राहू नये याकरिता, स्पॉट ॲडमिशनदेखील केले जाणार आहे.राज्यात मुबंई, नागपूर, उदगीर, परभणी, शिरवड, अकोला व वरू ड या सात ठिकाणी माफसूंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालये आहेत. दुग्धशास्त्र, दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयाचा समावेश आहे. दुसर्‍या धवलक्रांतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. याकरिता पशुवैद्यक शास्त्रज्ञ निर्माण करण्यासाठी माफसू व इतर संबंधित शासकीय यंत्रणेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्या दृष्टीने पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. शिरवड व उदगीर येथे ३२ विद्यार्थी संख्या होती. आता ही संख्या दुप्पट म्हणजे ६४ करण्यात येत आहे. या संबंधीचे परिपत्रक महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याआधी निघणार असल्याचे वृत्त आहे. या दोन्ही महाविद्यालयाच्या जागा मिळून राज्यात पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची एकूण २६६ एवढी संख्या आहे. यामध्ये एनआयआर १० व व्हीसीआय ४० अशा एकूण ५० जागा आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी प्रवेशासाठी येतच नसल्यामुळे त्या जागा रिक्त राहतात. त्यामुळे या जागा आता माफसू भरणार आहे. अर्थात राज्यातील गरजू विद्यार्थ्यांना त्या जागेवर प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय या वर्षीपासून स्पॉट ॲडमिशन केले जाणार आहे. - प्रवेश शुल्क नातेवाइकांनी भरावे एनआयआर व व्हीसीआयकडून येणार्‍या विद्यार्थ्यांच्या यादीवर माफसूने काही अटी घातल्या आहेत. यातील ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांच्या स्थानिक नातेवाइकांना प्रवेश शुल्क अदा करावे लागणार आहे. तेव्हाच माफसू त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देईल.** पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यावर्षी प्रथमच एनआरआय व व्हीसीआयच्या कोट्यातील रिक्त जागा माफसू भरणार आहे. ज्यांना प्रवेश हवा आहे, त्यांच्या स्थानिक नातेवाइकांना प्रवेश शुल्क अदा करावे लागेल.  - डॉ. आदित्यकुमार मिश्र,  कुलगुरू माफसू, नागपूर.