शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया रॅली’ने सांगलीच्या सन्मानात भर!

By admin | Updated: October 15, 2016 17:57 IST

सांगली जिल्हा पोलिस दलाने आयोजित केलेल्या ‘निर्भया सायकल रॅली’च्या माध्यमातून महिलांचा सन्मान, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संतुलन आणि शारीरिक व्यायाम चतुसूत्री साध्य होणार आहे.

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. १५ -  जिल्हा पोलिस दलाने आयोजित केलेल्या ‘निर्भया सायकल रॅली’च्या माध्यमातून महिलांचा सन्मान, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संतुलन आणि शारीरिक व्यायाम अशी चतुसूत्री साध्य होणार आहे. या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे काम होत असल्याने सांगलीच्या सन्मानात भर पडणार आहे, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय एकात्मता, महिला सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी १५ आॅक्टोबर ते २१ आॅक्टोबरदरम्यान ६०२ किलोमीटर अंतराच्या ‘निर्भया सायकल रॅली’चे आयोजन केले आहे. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या आवारात शनिवारी सकाळी खोत यांच्याहस्ते रॅलीचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, महापौर हारुण शिकलगार, माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिलल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी), सुहास पाटील उपस्थित होेते. खोत म्हणाले, पोलिसांनी राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे काम होत असल्याने सांगलीच्या सन्मानात भर पडणार आहे. महिलांचा सन्मान आणि सायकलच्या माध्यमातून प्रदूषण वाढणार नाही, हे हेतू साध्य होतील. तळागाळातील माणसाला पोलिस दल आपल्या सोबत आहे, हा विश्वास निर्माण होईल. पोलिस दलाचीही प्रतिमा उंचावणार आहे. सामान्य माणसाला निर्भयपणे जगता येईल, असा संदेश दिला आहे.
पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दलाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या कल्पनेतून सांगली जिल्ह्यात महिला सुरक्षेसाठी निर्भया पथके तैनात केली आहेत. महिलांना सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याबरोबरच त्यांना तसे वातावरण आहे, याची खात्री देणे महत्त्वाचे आहे. २१ आॅक्टोबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ही रॅली फिरणार आहे. यामध्ये ६९१ जणांनी सहभाग नोंदविला आहे.
सायकल रॅलीत माधवनगर (ता. मिरज) येथील गोविंद परांजपे, सांगलीवाडीचे दत्ता पाटील या ज्येष्ठ सायकलपटूंसह अबालवृद्ध सहभागी झाले आहेत. १७ शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी व जनतेला रॅलीचे महत्त्व सांगितले जाणार आहे. रॅलीच्या रस्त्यावरील सर्व ग्रामपंचायती, सरपंच, शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनाही या रॅलीमध्ये सहभागी केले आहे.
सायकल रॅलीचा प्रवास
शनिवारी मिरज, कवठेमहांकाळ, जत मार्गे गुड्डापूर हे ११७ किलोमीटर अंतर पार करून गुड्डापूर येथे मुक्काम आहे. १६ आॅक्टोबरला गुड्डापूरहून उमदी, जत येथून आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) मुक्काम करुन १२५ किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. १७ आॅक्टोबरला आरेवाडीतून आटपाडी, विटा तासगाव हे १३२ किलोमीटर अंतर पार करणार आहे. तासगाव येथे मुक्काम आहे. १८ आॅक्टोबरला तासगावहून पलूस, सागरेश्वर, देवराष्ट्रे, इस्लामपूरहून शिराळ्याला मुक्काम करणार आहे. हे अंतर ८४ किलोमीटर आहे. १९ आॅक्टोबरला शिराळ्याहून कोकरुड, सोनवडेतून चांदोली येथे मुक्काम आहे. हे अंतर ४० किलोमीटर आहे. २० आॅक्टोबरला चांदोली फॉरेस्ट वाईल्ड लाईफ सॅनेटरी (नेचर ट्रॅक) करून चांदोलीतच मुक्काम आहे. २१ आॅक्टोबरला चांदोलीहून कोकरुड, आष्टा मार्गे १०४ किलोमीटर अंतर पार करून सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात रॅलीची सांगता होणार आहे.