शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

दासबोधाच्या जयंतीनिमित्ताने शिवथरघळीत निनादतोय ‘जय जय रघुवीर समर्थ’ जयघोष

By admin | Updated: February 15, 2016 16:19 IST

समर्थ रामदास स्वामींनीं दासबोधा ग्रंथाचे सन १६५४ मध्ये लेखन पूर्ण केले. माघ नवमी या दिवशी या महाग्रंथाची निर्मिती झाली, त्यास मंगळवार दि. १६ फेब्रुवारी रोजी ३६२ वर्ष पूर्ण होत आहेत.

-  जयंत धुळप 
 
अलिबाग, दि. १५ - 
भक्तांचेनि साभिमानें। कृपा केली दाशरथीनें। समर्थकृपेचीं वचनें। तो हा दासबोध ॥
वीस दशक दासबोध। श्रवणद्वारें घेतां शोध। मनकत्र्यास विशद। परमार्थ होतो ॥
वीस दशक दोनीसें समास। साधकें पाहावें सावकास। विवरतां विशेषाविशेष। कळों लागे ॥
ग्रंथाचें करावें स्तवन। स्तवनाचें काये प्रयोजन। येथें प्रत्ययास कारण। प्रत्ययो पाहावा ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
असे वर्णन करत दस्तूरखुद्द समर्थ रामदास स्वामींनीं दासबोधा ग्रंथाचे सन १६५४ मध्ये लेखन पूर्ण केले. माघ नवमी या दिवशी या महाग्रंथाची निर्मिती झाली, त्यास मंगळवार दि. १६ फेब्रुवारी रोजी ३६२ वर्ष पूर्ण होत आहेत. 
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यांत महाडपासून तीस किमी अंतरावर असलेल्या पर्वतराजीतील वाघजई दरीच्या कुशीतील ‘शिवथरघळ’ येथे रामदास स्वामींनी या दासबोधाची रचना साकारली. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, पुढे ही नदी सावित्नी नदीला जाऊन मिळते. काळ नदिच्या काठावरी कुंभे, कसबे आणि आंबे अशी तीन शिवथर गावे येथे आहेत. चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार वनराईत झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथर घळ आहे. या घळीला समर्थ रामदास स्वामी ’सुंदरमठ’ असे म्हणत असत.
 
छत्रपती शिवाजी महारांजांनी येथेच घेतले रामदास स्वामींचे आशिर्वाद : 
शिवथरघळ आणि त्या आसपासचा सर्व परिसर त्याकाळी चंद्रराव मोरे यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे. जावळीचे मोरे हे विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. सन १६४८ मध्ये छत्रपती शिवाजी महारांजांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आणि समर्थ रामदास स्वामी सन १६४९ मध्ये या घळीत वास्तव्यासाठी आले. ते दहा ते अकरा वर्षे या शिवथर घळीत राहत होते. दासबोधाचा जन्म याच घळीत झाला. दासबोधाची सात आठ दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली. सन १६७६ मध्ये दक्षिणदिग्विजयासाठी जातांना श्री समर्थांचा आशीर्वाद येथेच घेऊनच छत्नपती शिवाजी महाराज पुढे रवाना झाले. 
 
सुसंस्कारीत करणारा दासबोध :
दासबोध हा समर्थ रामदास स्वामींनी रचला. त्याचे लिखाण त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींयांनी केले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १९ समास आहेत. एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांच्या, साधकांच्या, निस्पृहांच्या, विरक्तांच्या, सर्व सामान्यांच्या, बालकांच्या, प्रौढांच्या,जराजर्जरांच्या अशा सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्नी-पुरु षांच्या मानवी मनाला उपदेश केला आहे. मानवी मनास सुसंस्कारीत करणा:या या ग्रंथाचे पारायण देखील केले जाते.
 
समर्थभक्त श्री. शंकर कृष्ण देव यांनी शोधून काढली घळ :
आजच्या जगाला या घळीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थभक्त श्री. शंकर कृष्ण देव यांनी सन 1क्3क् साली लावल्यावर या घळीचे अनन्य साधारण महत्व सर्वाच्या लक्षात आले. त्यानंतर सन १९६६ मध्ये श्रीधर स्वामी या शिवथर घळीत आले त्यावेळी सर्वप्रथम माघ नवमीस ‘दासबोध जंयती’ सोहोळा येथे झाला. त्यानंतरच्या कालखंडात सन १९८५ मध्ये श्री सुंदरमठ शिवथर घळ सेवा समिती आणि श्री समर्थ सेवामंडळ सज्जनगड यांच्या सहयोगाने दरवर्षी घळीत माघ प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस ‘दासबोध जंयती’उत्सवाचे आयोजन करण्यात येवू लागले, यास यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याची माहिती श्री समर्थ सेवा मंडळ समीतीचे सदस्य शरद गांगल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
 
दासबोध ग्रंथ पालखी आणि महाप्रसादाने उत्सवाची सांगता : 
माघ प्रतिपदेपासून सुरु होणा:या या ‘दासबोध जंयती’ सोहोळ्य़ात पहाटे काकड आरती, रामनाम जप, दासबोध पारायण, दासबोध व अन्य एक ग्रंथ अशी दररोज दोन प्रवचने, सायंकाळी उपासना, रात्री वारकरी भजन मंडळांच्या भजनाची बारी असे धार्मीक कार्यक्रम होतात. माघ नवमीच्या दिवशी सकाळी दासबोध ग्रंथाची शानदार पालखी काळ नदिच्या काठावरी कुंभे, कसबे आणि आंबे या तिनही शिवथर गावांमध्ये फिरुन पुन्हा शिवथर घळीत येते आणि तेथे महाप्रसादाचा लाभ सर्वानी घेतल्यावर ‘दासबोध जंयती’उत्सवाची सांगता होते असेही गांगल यांनी अखेरीस सांगितले.