शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जवानाच्या अंत्यविधीवेळी आलेल्यांवर कोसळली गॅलरी, नऊ महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 20:17 IST

अहमदनगरमध्ये दुख:द घटना घडली आहे. कर्तव्य बजावत असलेल्या जवानाच्या अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांच्या अंगावर भींत कोसळल्यामुळे 9 महिला जखमी झाल्या आहेत. यामधील चौघींची प्रकृती गंभीर आहे.

अहमदनगर, दि. 15 : अहमदनगरमध्ये दुख:द घटना घडली आहे. कर्तव्य बजावत असलेल्या जवानाच्या अंत्यसंस्काराला आलेल्या लोकांच्या अंगावर भींत कोसळल्यामुळे 9 महिला जखमी झाल्या आहेत. यामधील चौघींची प्रकृती गंभीर आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेले जवान दत्तात्रय बाळासाहेब बनकर यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या महिलांच्या अंगावर गॅलरीची भिंत कोसळली. नगर तालुक्यातील अकोळनेर येथे झालेल्या या घटनेत नऊ महिला जखमी झाल्या असून त्यामधील चौघींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी नगरला हलवण्यात आलं आहे.

जवान दत्तात्रय बाळासाहेब बनकर ( वय 34) हिमाचल प्रदेशमध्ये असताना बफार्खाली दबून मरण पावले. त्यांच्यावर नगर तालुक्यातील अकोळनेर या गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मृतदेह आज दुपारी आणण्यात आला. त्यांच्या घरासमोर अंत्यविधीसाठी गावातील ग्रामस्थ, नातेवाईक जमले होते. अंत्यदर्शनासाठी मृतदेह घराच्या अंगणात ठेवण्यात आला होता.

मृतदेहाशेजारी काही महिला बसल्या होत्या. अंगणात गर्दी झाल्याने काही जण छतावर चढले. याचवेळी या भिंतीवर दबाव वाढल्याने भिंत कोसळली. यामुळे खाली बसलेल्या महिलांच्या अंगावर स्लॅबचा भाग पडला. या जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान