शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

१५ महिन्यांत ९ हजार फुकटे प्रवासी

By admin | Updated: August 2, 2016 03:53 IST

विनातिकीट प्रवास करणे, हा सामाजिक गुन्हा असतानाही लोकलने विनातिकीट बेधडक प्रवास केला जातो.

पंकज रोडेकर,

ठाणे- विनातिकीट प्रवास करणे, हा सामाजिक गुन्हा असतानाही लोकलने विनातिकीट बेधडक प्रवास केला जातो. अशा प्रकारे ठाणे रेल्वे स्थानकात मागील १५ महिन्यांत जवळपास ९ हजार विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडले आहे. ही कारवाई रेल्वे प्रशासनाने केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून जवळपास २४ लाख ७५ हजारांचा दंड आकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऐतिहासिक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सुमारे ७-८ लाख प्रवासी येजा करीत असल्याने नेहमीच गजबलेला असतो. या रेल्वे स्थानकात एकूण १० फलाट असून येथून मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल धावतात. त्यातच या स्थानकातून आतबाहेर करण्यासाठी जवळपास अधिकृत १९ मार्गिका आहेत. त्यामधील फलाट क्रमांक २ आणि १० यावरून थेट बाहेर पडणे शक्य होते. ठाणे शहराचे दिवसेंदिवस झपाट्याने नागरीकरण होत असल्याने कळतनकळत त्या स्थानकावर ताण पडताना दिसतो. सर्वाधिक व्यस्त स्थानक अशी ओळख असलेल्या या स्थानकातून ठाणे ते बोरीबंदर पहिली लोकल धावली. त्यामुळे या स्थानकाला विशेष महत्त्व आहे. येथे पहिल्या सरकत्या जिन्यापासून वातानुकूलित शौचालयासह अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था केली आहे. त्यातच, मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या शहरांत येण्याजाण्यासाठी या स्थानकाची मदत होत असल्याने लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्यादेखील वाढली.>विशेष म्हणजे सर्वाधिक अशा प्रकारे प्रवास करणारे प्रवासी हे फलाट क्र मांक २, ९ व १० वर अधिक प्रमाणात आढळून आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.