शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डीआरआयकडून नऊ लाखांच्या बनावट नोटा जप्त, काँग्रेस पदाधिका-यांसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 20:34 IST

भारतीय चलनातील नव्या पाचशे रुपये किमतीच्या तब्बल नऊ लाखांच्या बनावट नोटा महसूल संचालनालयाच्या गुप्तचर पथकाने (डीआरआय) जप्त केल्या.

मुंबई : भारतीय चलनातील नव्या पाचशे रुपये किमतीच्या तब्बल नऊ लाखांच्या बनावट नोटा महसूल संचालनालयाच्या गुप्तचर पथकाने (डीआरआय) जप्त केल्या. याप्रकरणी पश्चिम उपनगरातील एका काँग्रेसच्या पदाधिकारी व बिल्डरासह तिघा जणांना अटक केली. हाजी इम्रान शेख, हालीम चंदानी व झाहीद शेख अशी त्यांची नावे असून, रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता सर्वांना न्यायालयीन कोठडी मिळाली. तिघांनी या नोटा कोठून मिळविल्या, या रॅकेटमध्ये आणखी कोण आहेत, याचा तपास करण्यात येत असल्याचे ‘डीआरआय’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.केंद्र सरकारने गेल्यावर्षी ८ नोव्हेंबरला ५०० व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नव्याने बाजारात आणलेल्या दोन हजार व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा समाजकंटकांनी खपविण्यासाठी बाजारात आणल्या आहेत. त्याविरुद्ध पोलिसांबरोबरच महसूल संचालनालयाच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. पश्चिम उपनगरातील वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)येथील मॅकडोनाल्डच्या परिसरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन काही जण येणार असल्याची माहिती डीआरआय गुप्तचर विभागातील अधिका-यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना पकडले. झडतीमध्ये त्याच्याकडील बॅगेत पाचशे रुपये किमतीच्या ९ लाखांच्या बनावट नोटा मिळून आल्या. अटक केलेला शेख हा काँग्रेस ब्लॉक कमिटी जनरल सेक्रटरी आहे तर हालीमचंदानी हा बांधकाम व्यावसायिक असून त्यांची उपनगरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहे.झाहीद शेख बनावट नोटा खपविण्यासाठी त्यांना सहकार्य करीत होता. असे अधिका-यांंकडून सांगण्यात आले. हालीमचंदानी याच्यावर यापूर्वीही फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. बनावट रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहेत, त्या दृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले.-------------महिन्यात तिसरी कारवाईडीआरआयच्या पथकाकडून बनावट नोटाविरुद्ध मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात ही तिसरी कारवाई असून आतापर्यत एकुण २४ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात आले. पहिल्या दोन कारवाईमध्ये दोन हजार रुपयाच्या प्रत्येकी साडेसात लाखाच्या नोटा पकडल्या होत्या. ही मोहीम यापुढेही कायम राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.