लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे रविवारी रात्री झालेल्या दंगलप्रकरणी दोन्ही गटांतील १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यात सहा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी, तर तिघांविरुद्ध दंगल व जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.अमोल गोकुळ पाटील व योगेंद्र उर्फ बंटी अरुण साळुंखे या दोन तरुणांमध्ये दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून रविवारी रात्री वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. तुफान दगडफेक झाली, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, तर पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडण्यात आली. या धूमश्चक्रीत आठ जण जखमी झाले होते. दंगलखोरांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. सोमवारी दुसऱ्या दिवशी गावात तणावपूर्ण शांतता होती.
दंगलप्रकरणी नऊ अटकेत
By admin | Updated: June 6, 2017 05:19 IST