गुहागर : रत्नागिरीपासून सिंधुदुर्गर्पयत लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांनी आतल्या गाठीचे राजकारण केले. आपल्या पराभवाला अप्रत्यक्षपणो जाधव जबाबदार आहेत, याचा राग आपल्या मनात आहे. ही लढाई कोणत्याही पक्षाविरोधात नसून एका व्यक्तीविरोधात आहे. म्हणूनच आपण गुहागर मतदारसंघातून अपक्ष विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा माजी खासदार नीलेश राणो यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. याबाबत आपण आपले वडील उद्योगमंत्री नारायण राणो यांना कोणतीही कल्पना दिलेली नसल्याचेही ते म्हणाले.
या कोणावरही आपल्यामुळे अन्याय होऊ नये यासाठी अपक्षच उभे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)