शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

बॅँक फसवणूकप्रकरणी नीलेश पारीखला अटक

By admin | Updated: May 9, 2017 01:59 IST

देशभरातील २० बँकांकडून फंडिंगच्या नावाखाली घेतलेल्या रकमेतून २ हजार २२३ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कोलकात्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभरातील २० बँकांकडून फंडिंगच्या नावाखाली घेतलेल्या रकमेतून २ हजार २२३ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कोलकात्यातील श्रीगणेश ज्वेलरी हाऊस लि. कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष नीलेश पारीखला सोमवारी मुंंबई विमानतळावरून अटक केली. सीबीआयने ही कारवाई केली आहे. कोलकाता येथील सोने व्यापारी कंपनीचा मालक असलेल्या पारीख याने २० राष्ट्रीय बँकांसोबत आणखी पाच सहकारी बँकांकडून २ हजार ६७२ कोटी रुपये कर्जाऊ घेतले होते. सोने आयात करून दागिने बनवून निर्यात करण्याचा व्यवासय कंपनी करत असल्याचे पारीख यांनी बँकांना दाखविले होते. यातच हाँगकाँंग, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये काही कंपन्या असल्याचे भासवून कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची आयात-निर्यात केल्याचे दाखवत यात आपल्याला नुकसान झाल्याचे जाहीर केले. फसवणूक झालेल्या बँकांच्या वतीने स्टेट बँक आॅफ इंडियाने याप्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीवरून सीबीआयने गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. गुन्हा दाखल होताच पारीख दुबईला पळून गेला होता. सोमवारी तो मुंबईत येणार असल्याची माहिती सीबीआयला मिळाली. त्यानुसार सीबीआयने सापळा रचून त्याला मुंबई विमानतळावरुन अटक केली.