शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

गोऱ्हेंचे ‘ते’ विधान मूर्खपणाचे; साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेल्या विधानावर शरद पवार यांनी फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 06:12 IST

कमी कालावधीत चार पक्ष बदललेल्या नीलम गोऱ्हे यांना आमदारकीच्या चार टर्म कशा मिळाल्या, हे सर्वांनाच माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिंदेसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेले विधान मूर्खपणाचे होते, त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन फटकारले. 

कमी कालावधीत चार पक्ष बदललेल्या नीलम गोऱ्हे यांना आमदारकीच्या चार टर्म कशा मिळाल्या, हे सर्वांनाच माहिती आहे. गोऱ्हे यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत काम केले, त्यानंतर त्या राष्ट्रवादीमध्ये आल्या. नंतर त्या ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या. आता त्या शिंदेसेनेत काम करत आहेत. एवढ्या मर्यादित कालावधीत त्यांनी चार पक्ष बदलले. हा अनुभव लक्षात घेता त्यांनी असे भाष्य करायला नको होते, असा टोला पवार यांनी लगावला.

उद्धवसेनेचा टोला तर शिंदेसेनेकडून पाठराखण उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोमवारीही गोऱ्हे यांचा अत्यंत तिखट शब्दांत समाचार घेतला. ज्या सोन्याच्या ताटात खाल्ले, त्यातच घाण करून गेल्या, असे राऊत म्हणाले....तर हा महिलांचा अपमान असून, त्या गाड्या कोणाच्या नावावर आहेत, हे आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही बोललो तर इज्जत जाईल, असा इशारा देत शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी गोऱ्हे यांची पाठराखण केली.

राऊत म्हणाले ते बरोबरचसाहित्य संमेलनाच्या मंचावरून झालेल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार आहेत. त्यामुळे पवारांनी गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध करावा, अशी मागणी खा. संजय राऊत यांनी केली होती.त्यावर बोलताना पवार म्हणाले, राऊत म्हणाले ते १०० टक्के बरोबर आहे. मी साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो. त्यामुळे त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर त्यावर माझा काही आक्षेप नाही. मात्र, साहित्य संमेलनाचा वापर हा राजकीय कारणासाठी होतोय, हा आरोप खरा नाही.

नैतिकता आणि मंत्र्यांचा काही संबंध नाहीबीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर ग्रामस्थांच्या आणि राज्यातील लोकांच्या तीव्र भावना पाहिल्यानंतर स्वाभिमान असणारी कुणीही व्यक्ती त्या पदावर अजिबात राहणार नाही.यापूर्वी काही मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना पद सोडावे लागले आणि चौकशी झाली होती. परंतु, सध्या आरोप होत असलेल्या मंत्र्यांचा आणि नैतिकतेचा काही संबंध असल्याचे जाणवत नाही, असा टोला पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना लगावला.

त्या काय म्हणाल्या होत्या?साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळत होते, असा आरोप केला होता. 

बोलताना मर्यादा पाळा प्रत्येकाने बोलताना मर्यादा पाळायला हव्यात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNeelam gorheनीलम गो-हे