शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून महिलेस फसविणारा नायजेरियन युवक गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 21:05 IST

विवाह संबंध जुळविणा-या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिची आर्थिक फसवणूक करणा-या नायजेरियन युवकास ठाणे पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याजवळून तीन बनावट पासपोर्ट जप्त केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

ठाणे, दि. 13 - विवाह संबंध जुळविणा-या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिची आर्थिक फसवणूक करणा-या नायजेरियन युवकास ठाणे पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याजवळून तीन बनावट पासपोर्ट जप्त केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणा-या एका महिलेने विवाहासाठी भारत मेट्रोमोनी डॉट कॉम या संकेतस्थळावर स्वत:चा तपशील दिला होता.या तपशिलाच्या आधारे अमादी क्लेमेंट या नायजेरियन युवकाने दिनेश चेवन या बनावट नावाने महिलेशी संपर्क साधला. हँगआऊट अॅपच्या माध्यमातून त्याने महिलेशी संबंध वाढवून विश्वास संपादन केला. आपण दिल्ली विमानतळावर आल्याचे सांगून जास्त सामान असल्याने कस्टम ड्युटी भरण्यासाठी त्याने महिलेस पैशाची मागणी केली. त्याने दिलेल्या खात्यामध्ये महिलेने 1 लाख 57 हजार 700 रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर महिलेने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. सायबर सेलने या प्रकरणाचा समांतर तपास करून तांत्रिक माहिती गोळा केली. त्याआधारे आरोपीचे वास्तव्य नवी दिल्ली येथे असल्याचे समजले. पोलिसांचे पथक नवी दिल्ली येथे पोहोचले असता, आरोपीचे वास्तव्य असलेल्या इमारतीमधील नायजेरियन रहिवाशांनी इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरून कुलूप लावले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पथकातील दोन शिपायांनी बाजूच्या इमारतीच्या टेरेसवरून आरोपीच्या इमारतीमध्ये प्रवेश केला.मुख्य प्रवेशद्वाराची चावी मिळवल्यानंतर संपूर्ण पथकाने प्रवेश करून अमादी क्लेमेंट याला अटक केली. आरोपीजवळून नामिबियाचा एक आणि दक्षिण आफ्रिकेच्या दोन बनावट पासपोर्टसह लॅपटॉप, पाच मोबाईल फोन, मोडेम, तीन सीम कार्ड आणि 66 हजार रुपये रोख जप्त केल्याची माहिती सायबर सेलचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. याच पद्धतीने आरोपीने यापूर्वी आणखी दोन महिलांची फसवणूक केली होती. तीन वर्षापासून तो भारतात अनधिकृतरित्या वास्तव्यास असल्याची माहितीही पोलिसांनी यावेळी दिली. पिडित महिलेने आरोपीसोबत एकदाही मोबाईल फोनवर संभाषण केले नव्हते. आरोपीस दीड लाख रूपये देण्यापूर्वी तिने थोडीफार खबरदारी घेतली असती तरी तो भारतीय नसल्याचे सहज समजले असते, असे डॉ. संदिप भाजीभाकरे यांनी यावेळी सांगितले.--------------------मेट्रोमोनी वेबसाइटच्या मदतीने गरजू महिलांना हेरून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडतात. अशा प्रकारच्या अनेक घटनांमध्ये नायजेरियन युवकांचा सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कुणालाही आर्थिक मदत करण्यापूर्वी महिलांनी पुरेपूर खबरदारी घ्यावी.- डॉ. संदीप भाजीभाकरेपोलीस उपायुक्त, सायबर सेल