शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षी म्हाडाची दहा हजार घरे !

By admin | Updated: March 29, 2016 03:56 IST

सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार करणारे म्हाडा प्राधिकरण पुढल्या वर्षी कोकणासह मुंबईत दहा हजार परवडणाऱ्या दरातील घरे जनतेसाठी उपलब्ध करून देणार आहे. तशी घोषणाच म्हाडाने

मुंबई : सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार करणारे म्हाडा प्राधिकरण पुढल्या वर्षी कोकणासह मुंबईत दहा हजार परवडणाऱ्या दरातील घरे जनतेसाठी उपलब्ध करून देणार आहे. तशी घोषणाच म्हाडाने सोमवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात केली आहे. म्हाडा प्राधिकरणाने ६ हजार ५०८.१९ कोटींचा अर्थसंकल्प मांडला आहे. घरे बांधण्यासाठी जमीन खरेदी करता यावी, म्हणून अर्थसंकल्पात २५७.९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे २०१५-१६चे सुधारित अर्थसंकल्प अंदाजपत्रक व २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला प्राधिकरणाच्या सोमवारच्या विशेष बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राधिकरणांतर्गत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व कोकण ही सात प्रादेशिक गृहनिर्माण मंडळे तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ तसेच झोपडपट्टी सुधार मंडळ कार्यरत आहेत. अर्थसंकल्पानुसार, म्हाडाच्या उपलब्ध जमिनीवरील कार्यक्रमांबरोबरच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात घरबांधणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शिवाय त्यासह जवळपास ३ हजार ९०० कोटी रुपयांचा खर्च २०१६-१७ मध्ये अपेक्षित आहे. भविष्यकालीन आवश्यकता विचारात घेता २५७.९० कोटींची तरतूद जमीन खरेदी व जमीन विकासासाठी पुढील वर्षासाठी करण्यात आली आहे. इमारत दुरुस्ती मंडळाच्या माध्यमातून २०१५-१६ मध्ये ६७१ मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी ६८० इमारतींची दुरुस्ती करणे प्रस्तावित आहे. पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतील इमारतीच्या देखभालीसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.