शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

गुटखाबंदीनंतर पुढचे लक्ष्य मावाबंदी

By admin | Updated: May 31, 2014 22:04 IST

पुढच्या टप्प्यात तंबाखुपासून बनविल्या जाणार्‍या माव्यावर बंदी घालण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी दिली.

महेश झगडे यांचे प्रतिपादन : जागतिक तंबाखू विरोधी दिन पुणे : राज्य शासनाने लागू केलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधी सुपारीवरील बंदीनंतर देशात सर्वाधिक ३३ कोटी रूपयांचा गुटखा महाराष्ट्रात जप्त करण्यात आला आहे, आता पुढच्या टप्प्यात तंबाखुपासून बनविल्या जाणार्‍या माव्यावर बंदी घालण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी दिली.जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मुक्तांगण संस्थेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट, मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर झगडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.झगडे म्हणाले, 'राज्य शासनाने १८ जुलै २००८ पासून राज्यात गुटखा बंदी लागू केली, त्यापूर्वी २००२ मध्ये लागू केलेली गुटखाबंदी न्यायालयाने उठविली होती. त्यामुळे यावेळेस गुटखाबंदी लागू करताना ती न्यायालयामध्ये टिकेल, याचा विचार करण्यात आला. त्यामुळे त्याचवेळी सरसकट तंबाखूवर बंदी घालण्यात आली नाही. सिगारेट ही अन्न या सदरात येत नसल्याने त्यावर बंदी घालण्याचा अधिकार कायद्यानुसार अन्न व औषध प्रशासनास नाहीत त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात कायदेशीर अडचण निर्माण झाली. पहिला टप्पा म्हणून गुटख्यावर बंदी घातली गेली. पुढील टप्प्यात माव्यावर बंदी घालण्याचे लक्ष्य आहे.' मुक्तांगणमध्ये व्यसनांवर उपचार घेत असलेल्या रूग्णांशी झगडे यांनी संवाद साधला. व्यसनांशी लढा देऊन त्यामधून बाहेर पडणार्‍यांनी त्यांचे संघटन उभारून व्यसनांविरूध्द संघटितपणे लढा द्यावा, अशी सूचना झगडे यांनी केली. औषधे बाद ठरत आहेतविविध रोगांवर पूर्वी हमखास चालणारी औषधे आता दाद देईनाशी झाली आहेत, त्यातच १९८७ नंतर नवीन औषधांचा दुष्काळ निर्माण झाला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रप्शिन शिवाय औषधे घेण्यातून असे प्रकार घडत आहेत. औषधे बाद ठरण्याचा प्रकार हा ग्लोबल वार्मिंगपेक्षा घातक ठरू शकेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याची माहिती झगडे यांनी दिली.तब्बल ३५ टक्के लोकांकडून तंबाखू सेवनवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या शास्त्रीय अभ्यासानुसार देशभरातील तब्बल ३५ लोकांकडून तंबाखू सेवन केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये २१ टक्के लोक हे तंबाखू खातात तर ९ टक्के लोक धुम्रपान करतात, ५ टक्के जण दोन्हीमध्ये सहभागी आहेत, अशी माहिती झगडे यांनी दिली.