शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नववर्षारंभ शोभा यात्रांसंगे

By admin | Updated: March 22, 2015 00:00 IST

नारीशक्तीचा प्रभाव...मोटारसायकल चालवण्यापासून ते ढोल पथकांपर्यंत महिला उत्साहाने पुढे होत्या. गिरगावमधील शोभायात्रेत ढोल वाजवण्यात रमलेली ही तरुणी.शोभा यात्रेतून सामाजिक संदेश देण्याची परंपरा यंदाही कायम होती. डोंबिवलीतील स्वागत यात्रेत वॉट्स अ‍ॅप व फेसबुकच्या दुष्परिणामाकडे लक्ष वेधणारी चिमुकली.गुढीपाडव्याचे आकर्षण ठरणा-या डोंबिवलीतील शोभा यात्रेत आबालवृद्ध पारंपारिक वेशात नटूनथटून सहभागी झाले होते.अलिबागमधील शोभा यात्रेत ...

नारीशक्तीचा प्रभाव...मोटारसायकल चालवण्यापासून ते ढोल पथकांपर्यंत महिला उत्साहाने पुढे होत्या. गिरगावमधील शोभायात्रेत ढोल वाजवण्यात रमलेली ही तरुणी.

शोभा यात्रेतून सामाजिक संदेश देण्याची परंपरा यंदाही कायम होती. डोंबिवलीतील स्वागत यात्रेत वॉट्स अ‍ॅप व फेसबुकच्या दुष्परिणामाकडे लक्ष वेधणारी चिमुकली.

गुढीपाडव्याचे आकर्षण ठरणा-या डोंबिवलीतील शोभा यात्रेत आबालवृद्ध पारंपारिक वेशात नटूनथटून सहभागी झाले होते.

अलिबागमधील शोभा यात्रेत चित्तथरारक कसरती सादर करताना तरुण.

शूर आम्ही सरदार... नवी मुंबईतील शोभायात्रेत शिवाजी महाराजांवरील आधारित चित्ररथ. शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या वेशभूषेतील ही लहान मुलं सर्वांच लक्ष वेधून घेत होती

आता मिशन कल्याण डोंबिवली...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण व डोंबिवलीमधील स्वागत यात्रेला हजेरी लावली. कल्याण - डोंबिवलीत आगामी काळात महापालिका निवडणूक होणार असून या महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणवार असा निर्धार फडणवीस यांनी केला असावा.

स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ रोवणा-या डोंबिवलीत शोभा यात्रेत महिलांचे झांज पथक.

प्रजासत्ताक दिनी राजपथावर अव्वल ठरलेले पंढरीची वारी हे चित्ररथ गिरगावमधील शोभा यात्रेच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.

जुहू चौपाटीवर १०० फूट उंच गुढी उभारण्यात आली होती. ही गुढी यंदाचे वैशिष्ट्य ठरली होती.

गुढी पाडवा जल्लोषात साजरा व्हावा यासाठी बंदोबस्तावर असलेल्या या महिला पोलिसांनी स्वागत यात्रेची छबी मोबाईलमधील कॅमे-यात टिपली.

मुंबईतील गिरगाव येथील स्वागत यात्रेत मराठमोळ्या वेशातील या तरुणींनी दुचाकीवर चित्तथरारक कसरत करुन हम भी किसी से कम नही असा संदेश दिला.

पारंपारिक वेषात यात्रेत मोटारसायकलवरुन शोभा यात्रेत सहभागी झालेल्या या महिला. स्त्री शक्तीचे आधुनिक रुप या यात्रेत बघायला मिळाले.

गुढी पाडव्याला मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त राज्याच्या विविध भागांमध्ये स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेता अभिषेक बच्चन व त्याची पत्नी ऐश्वर्या राय - बच्चन यांनी मुंबईतील स्वागत यात्रेत सहभागी होत उपस्थितांचा उत्साह वाढवला. राज्यातील शोभा यात्रांचा टाकलेली एक नजर