शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र चव्हाणांवर भाजपाची नवी जबाबदारी; कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 21:58 IST

बावनकुळे आणि चव्हाण हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे आहेत.

मुंबई - मंत्रिमंडळात डावलले गेलेले भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपाने पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी याबाबत पत्र काढून चव्हाण यांची निवड केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद रवींद्र चव्हाण यांना मिळेल अशी चर्चा होती कारण विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्रि‍पदाची जबाबदारी मिळाली आहे. बावनकुळे यांच्या जागी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. परंतु पक्षाने चव्हाण यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच राहावे अशा हालचाली पक्षात सुरू होत्या. काही दिवसांपूर्वीच प्रदेश संघटनपर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. भाजपच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी  चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली.महाराष्ट्रात सध्या संघटनपर्व सुरू असून त्यात भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. 

चंद्रकांत पाटील हे २०२२ मध्ये मंत्री होण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष होते. ते मंत्री होताच दोनच दिवसात चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र यावेळी बावनकुळे १५ डिसेंबरला मंत्री झाले तरीही नवीन अध्यक्षांची नियुक्ती पक्षाने केलेली नाही. बावनकुळे यांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत अध्यक्ष ठेवावे, यासाठी काही नेते आग्रही होते. त्यावर तोडगा म्हणून पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांना नेमले आहे.

दरम्यान, बावनकुळे आणि चव्हाण हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे आहेत. रवींद्र चव्हाण हे मराठा समाजाचे, तर बावनकुळे ओबीसी समाजाचे आहेत. बावनकुळे यांना मंत्रिमंडळात चौथे महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आता  चव्हाण यांच्या रूपाने मराठा कार्यकारी अध्यक्ष बनवून भाजपाने समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. उद्यापासून शिर्डीत भाजपाचं अधिवेशन होणार असून तत्पूर्वी केंद्रीय भाजपाने रवींद्र चव्हाण यांना नवी जबाबदारी दिली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे