कोल्हापूर/कसबा सांगाव : कोल्हापूर येथील तीन वर्षे दहा महिन्यांच्या खुशी कौशल संघवी हिने रविवारी सलग साडेतीन तास न थांबता २१.१४ किलोमीटर अंतर पार करत स्केटिंगमधील नवा विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाची नोंद आशिया बुक आॅफ रेकॉर्ड व इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली .पंचतारांकित एमआयडीसी येथील मुख्य रस्त्यावर रविवारी पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी खुशीने या उपक्रमास सुरुवात केली. तिने साडेतीन तासांत २१.१४ किलोमीटरचे अंतर स्केटिंग करत पार केले. या उपक्रमाची दखल इंडिया बुक व आशिया बुकचे गौरव हंडुजा यांनी घेत नवा विक्रम प्रस्थापित केल्याची यावेळी जाहीर केले. इंदुजा म्हणाले, खुशीने ऐतिहासिक कामगिरी केली असून, स्केटिंगमध्ये ही एक प्रेरणा ठरली आहे. यावेळी तिचा प्राचार्य अभयकुमार साळुंखे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, अनिल कदम, सुहास देशपांडे, पोपटलाल शहा (संघवी) यांच्या हस्ते आशिया व इंडिया बुक रेकॉर्डचे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी खुशीची आई स्नेहा व वडील कौशल संघवी यांच्यासह प्रशिक्षक महेश कदम, तेजस्विनी कदम, धनश्री कदम आदी उपस्थित होते. खुशी संघवी हिने रविवारी सलग २१.१४ कि.मी. अंतर पार करत स्केटिंगमधील नवा विक्रम प्रस्थापित केला. याबद्दल तिला इंडिया व आशिया बुक आॅफ रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र देताना गौरव हंडुजा, सोबत प्राचार्य अभयकुमार साळुंखे, महेश कदम, सुहास देशपांडे आदी उपस्थित होते.
खुशीने रचला नवा विक्रम
By admin | Updated: June 1, 2015 00:12 IST