शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नवी पेन्शन योजना राज्यातील न्यायाधीशांना सक्तीची नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:00 IST

महाराष्ट्रात १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त होणा-या न्यायाधीशांना नवी ‘डिफाइन्ड कॉन्ट्रिब्युशन पेन्शन स्कीम’ सक्तीने लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द

- विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त होणा-या न्यायाधीशांना नवी ‘डिफाइन्ड कॉन्ट्रिब्युशन पेन्शन स्कीम’ सक्तीने लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केला असून, या न्यायाधीशांना ही नवी पेन्शन योजना ऐच्छिक असेल, असे जाहीर केले आहे.राज्य सरकारने ३१ आॅक्टोबर २००५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाने (जीआर) त्यानंतर नियुक्त होणाºया सर्व सरकारी आणि निमसरकारी कर्मचाºयांना त्यापूर्वी लागू असलेल्या सरकारी पेन्शन योजनेऐेवजी ही नवी पेन्शन योजना सक्तीने लागू केली होती. मात्र, अन्य सरकारी कर्मचाºयांसोबत न्यायाधीशांनाही ही नवी पेन्शन योजना लागू करणे उच्च न्यायालयाने चुकीचे ठरविले आहे. परिणामी, १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त झालेल्या न्यायाधीशांना सरकारचा हा ‘जीआर’ लागू होत नाही व असे न्यायाधीश त्या आधी नियुक्त झालेल्या न्यायाधीशांप्रमाणेच जुन्या पेन्शन योजनेसाठी पात्र ठरतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.न्यायालयाने असेही जाहीर केले की, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या न्यायाधीशांना नवी पेन्शन योजना ऐच्छिक असेल. त्यानुसार, राज्य सरकारने त्यांना या योजनेत राहायचे की, त्यातून बाहेर पडायचे याचा पर्याय निवडण्यासाठी दोन महिन्यांची मुदत द्यावी. जे न्यायाधीश दोन महिन्यांत पर्याय देणार नाहीत, त्यांना नवी पेन्शन योजना नको आहे, असे गृहित धरले जाईल व त्यांना जुन्या पेन्शन योजनेचे लाभ मिळत राहतील.जे न्यायाधीश नवी पेन्शन योजना चालू न ठेवण्याचा पर्याय देतील, त्यांच्या पगारातून दरमहा कापून घेतलेली व पेन्शन फंडात जमा केलेली १० टक्के रक्कम सरकारने त्यांना परत करावी, असाही आदेश न्यायालयाने दिला. बिहार दुर्वे यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. ए. एस. मेनन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व जिल्हा न्यायाधीश या स्तरांवरील न्यायिक अधिकाºयांना हा निकाल लागू होईल. राज्यात या न्यायिक अधिकाºयांची संख्या तीन हजाराच्या आसपास आहे. त्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नेमलेले किती व नंतर नेमलेले किती, याची फोड लगेच उपलब्ध होऊ शकली नाही.नेमके काय झाले होते?देशभरातील न्यायाधीशांच्या सेवाशर्ती व पगार यांच्यावर विचार करण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाने ‘आॅल इंडिया जजेस असोसिएशन’ प्रकरणात न्या. शेट्टी आयोग नेमला होता. त्यानंतर, न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने न्या. पद्मनाभन आयोग नेमला. सर्वोच्च न्यायालयाने शेट्टी व पद्मनाभन आयोगाच्या शिफारशी काही दुरुस्त्यांसह स्वीकारून त्या लागू करण्याचा आदेश दिला. महाराष्ट्र सरकारने हे दोन्ही आयोग लागू केले व त्यानुसार न्यायाधीशांना पगार, भत्ते व पेन्शन देणे सुरू केले. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाकडून मूळ आदेशात बदल न करून घेता, राज्य सरकार न्यायाधीशांना लागू केलेली पेन्शन बदलू शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले.