शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: नारायण राणेंच्या मागील साडेसाती कायम; महापालिकेची नव्याने नोटीस, दिले आठ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:56 IST

दिशा सालियन हिच्या बदनामीबद्दल मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी शनिवारी राणे पिता / पुत्राची  नऊ तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणात दाखल गुन्ह्यात १० मार्चपर्यंत कारवाई न करण्याची सूचना न्यायालयाने दिली असली, तरी पुढील कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्यामागील साडेसाती संपण्याची सध्या तरी  चिन्हे नाहीत.  शनिवारी सुमारे नऊ तास पोलिसांच्या चौकशीला सामोरे गेल्यानंतर  अन्य एका अडचणीला सामोरे जावे लागले आहे. जुहू येथील त्यांच्या अधिश बंगल्यात नियमबाह्यपणे बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेनेही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  त्याबाबत आठ दिवसांमध्ये  आपले म्हणणे सादर करण्याची सूचना केली आहे. 

दिशा सालियन हिच्या बदनामीबद्दल मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी शनिवारी राणे पिता / पुत्राची  नऊ तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणात दाखल गुन्ह्यात १० मार्चपर्यंत कारवाई न करण्याची सूचना न्यायालयाने दिली असली, तरी पुढील कारवाईची टांगती तलवार कायम आहे. त्यातच पंधरवड्यापूर्वी झालेल्या बंगल्याच्या तपासणीप्रकरणी महापालिकेने रविवारी नव्याने नोटीस बजावली आहे.

महापालिकेच्या पथकाने २१ फेब्रुवारीला  राणे यांच्या  बंगल्याची   कसून पाहणी  केली होती. त्यामध्ये मूळ प्लॅनमध्ये बदल करून  बंगल्याचे बांधकाम करून  एफएसआयचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. तसेच अत्यावश्यक वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने मोकळे सोडण्यात आलेल्या जागेवर (रिफ्यूज एरिया) मध्ये बांधकाम करण्यात आले असून त्याबाबत  एमआरटीपी ५३ अंतर्गत  नोटीस बजावली असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे