शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

न्यू इंडिया इन्शुरन्सला ठोठावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 03:41 IST

अयोग्य कारण देऊन ग्राहकाचा नुकसान प्रतिपूर्ती दावा नाकारणाऱ्या दी न्यू इंडिया इन्शुरन्सला कंपनी लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १५ हजाराचा दंड सुनावला

ठाणे : अयोग्य कारण देऊन ग्राहकाचा नुकसान प्रतिपूर्ती दावा नाकारणाऱ्या दी न्यू इंडिया इन्शुरन्सला कंपनी लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १५ हजाराचा दंड सुनावला आहे.उल्हासनगर येथे राहणारे प्रदीपसिंग उलाख यांनी त्यांच्या वाहनाची दी न्यू इंडिया इंशुअरन्स कंपनीकडून २४ जानेवारी २००७ ते २३ जानेवारी २००८ या कालावधीसाठी विमा पॉलिसी काढली होती. याच दरम्यान उलाख यांनी ४ एप्रिल २००७ रोजी आपल्या वाहनातून अंबरनाथ येथील आगपेटी उत्पादक कंपनीचा माल वरूणा रोडलाईन्स मालवाहतूक संस्थेच्या माध्यमातून रामपूर येथे नेण्यासाठी घेतला. नाशिक येथे वाहन पोहचले असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरीला झाडाला ते धडकले आणि आगपेट्यांचे घर्षण झाल्याने वाहनाला आग लागली. अग्निशामक दलाने ती विझवली मात्र वाहनाचे नुकसान झाले. उलाख यांनी नुकसानीचा प्रतिपूर्ती दावा इन्शुरन्स कंपनीकडे केला. मात्र सेफ्टी मॅचेस (आगपेटी)चा समावेश फ्लेमेबल गुडस्मध्ये होत असल्याने अशा वस्तूंची वाहतूक करण्यास वेगळी नोंदणी करावी लागते. वाहनचालकास वेगळे लायसन घ्यावे लागते; मात्र उलाख यांनी यातील कोणतीच बाब केलेली नाही अशी कारणे देऊन त्यांचा दावा नाकारण्यात येतो, असे इन्शुरन्स कंपनीने नोव्हेंबर २००८ रोजी पत्राद्वारे कळविले. वाहनाचा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. आपला काही संबंध नाही, असे आगपेटी उत्पादक कंपनीने स्पष्ट केल्याने त्यांच्याविरोधातील तक्रार फेटाळण्यात आली. आमची नेमणूक केवळ मालाची वाहतूक करण्यासाठी केली होती, असे वरूणा रोडलाईन्स मालवाहतूक संस्थेने स्पष्ट केल्यावर त्यांच्याविरोधातील तक्रारही फेटाळली.कागदपत्र, पुरावे यांची पडताळणी केली असता वाहनाचा अपघात झाल्यावर इन्शुरन्स कंपनीने जळालेल्या मालाची पाहणी करण्यास सर्वेअर नेमला होता. त्यांनी पाहणी केली मात्र अपघात, त्याचे कारण, वाहन नुकसान याबाबतचा रिपोर्ट दिलेला नाही. तर इन्शुरन्स कं पनीने सेफ्टी मॅचेसचा समावेश फ्लेमेबेल गुडस्मध्ये होत असल्याचे कारण दिले असले तरी त्यांनी तशी नोंद असलेला यादीतील क्रमांक दिला नाही. चुकीचे कारण दिल्याचे स्पष्ट झाल्यामुळे दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने उलाख यांना ७,७८,९४७ रूपये ६ टक्के व्याजासह द्यावी आणि १५ हजार तक्रार खर्च द्यावा, असे आदेश मंचाने दिले आहेत.(प्रतिनिधी)चुकीच्या कारणाचा ठपकामुळात फ्लेमेबल गुडस्च्या यादीत सेफ्टी मॅचेसचा उल्लेख नाही. सेंट्रल मोटर वाहन नियम शेड्युलमधील नोंदीनुसार सेफ्टी मॅचेस या जनरल गुडस्मध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे चुकीचे कारण देऊन कंपनीने दावा नाकारला आहे, असे मंचाने स्पष्ट केले.