शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिनी महिलांसाठी नवी मैत्रीण, थेट फोनने साधा ‘सुहिता’शी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 05:02 IST

- विशेष प्रतिनिधी मुंबई : पीडित महिलांशी थेट फोनवर संवाद साधणारी नवी सुहिता नावाची मैत्रीण राज्य महिला आयोगाकडून महिला दिनापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली. महिलांना एखाद्या प्रसंगी तातडीने मदत, समुपदेशनाची गरज असते. ग्रामीण भागातील महिला अनेक वेळा एखाद्या प्रसंगात कधी भीतीपोटी तर ...

- विशेष प्रतिनिधी मुंबई : पीडित महिलांशी थेट फोनवर संवाद साधणारी नवी सुहिता नावाची मैत्रीण राज्य महिला आयोगाकडून महिला दिनापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली. महिलांना एखाद्या प्रसंगी तातडीने मदत, समुपदेशनाची गरज असते. ग्रामीण भागातील महिला अनेक वेळा एखाद्या प्रसंगात कधी भीतीपोटी तर कधी अज्ञानामुळे अन्यायाची वाच्यता कुठेही करत नाहीत. त्यातून त्यांचा कोंडमारा होतो. मानसिक खच्चीकरण होते. म्हणूनच महिला आयोगाने ८ मार्चच्या महिला दिनी महिलांना ‘सुहिता’ची भेट दिली आहे. ही समुपदेशानासाठीची हेल्पलाइन आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून समोरच्या महिलेचे म्हणणे ऐकून तिचे समुपदेशन केले जाईल. तसेच तक्रारीचे स्वरूप जाणून घेऊन संबंधित जिल्ह्यातील संबंधित विभागाला या हेल्पलाइनमार्फत ई-मेल करून तातडीने माहिती देण्यात येईल. तसेच या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकता असल्यास= आयोगामध्ये सुनावणीसाठीही बोलावण्यात येईल. या हेल्पलाइनवर जिने तक्रार केली आहे तिला तिच्या मोबाइलवर तिकीट नंबर मेसेज केला जाईल जेणेकरून त्याबाबत पाठपुरावा करणे सोपे होईल. हेल्पलाइनचे लोकार्पण ८ मार्चला आयोगाच्या मुंबई येथीलमुख्यालयात होणार आहे.या नंबरवर साधा संपर्कहेल्पलाइनसाठी ७४७७७२२४२४ हा फोन नंबर उपलब्ध करूनदेण्यात आला असून कार्यालयीन कामकाजाच्या वेळात हीहेल्पलाइन सुरू राहणार आहे. ती मराठी आणि हिंदी या दोनभाषांमधून उपलब्ध असल्याने त्याचा फायदा शहरी तसेचग्रामीण महिलांनाही चांगल्या प्रकारे होणार आहे. 

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८WomenमहिलाMaharashtraमहाराष्ट्र