शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

नवविवाहितेचा हुंड्यासाठी खून

By admin | Updated: September 12, 2014 00:53 IST

समाज आता पुढारला, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेला लग्नात महत्त्व दिले जात नाही. त्याचमुळे हुंडाबळीच्या घटनांना आळा बसल्याची चर्चा आता जाहीरपणे केली जाते. मात्र, या चर्चेत तथ्य नाही.

आधी बेदम मारहाण नंतर विषप्रयोग : वकील नवऱ्यासह तिघे गजाआड नागपूर : समाज आता पुढारला, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेला लग्नात महत्त्व दिले जात नाही. त्याचमुळे हुंडाबळीच्या घटनांना आळा बसल्याची चर्चा आता जाहीरपणे केली जाते. मात्र, या चर्चेत तथ्य नाही. सधन परिवारातील एका उच्चशिक्षित (वकील) तरुणाने आपल्या नवविवाहित पत्नीचा लग्नानंतर अवघ्या तीनच महिन्यात हुंड्यासाठी निर्घृण खून केला. लकडगंजमधील क्वेट्टा कॉलनीत ही संतापजनक घटना घडली असून, पोलिसांनी मृत विवाहितेचा नवरा, सासू आणि दिराला अटक केली. सोनाली अमोल बोरकर (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. भांडे प्लॉट नंदनवन येथील रहिवासी शंकरराव जागोबाजी टिपले (वय ५५) यांची ती मुलगी होय. टिपले डेकोरेशन व्यावसायिक आहेत. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्यातील सोनाली ही तिसऱ्या क्रमांकाची मुलगी. १७ जून २०१४ ला सोनालीचे क्वेट्टा कॉलनीतील अमोल पांडुरंग बोरकर (वय ३१) या वकिलासोबत थाटामाटात लग्न झाले. लग्नात टिपले यांनी वर पक्षाला रीतीरिवाजाप्रमाणे मोठ्या प्रमाणात भेटवस्तू आणि गोफ, अंगठीसह ५ तोळे सोन्याचे दागिने दिले. अमोल वकिलीसोबतच शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) चालवतो. सोनाली ही सुद्धा एमए बीएड् होती. त्यामुळे लग्नानंतर सोनलीसुद्धा पती अमोलसोबत उमिया शंकर शाळेजवळ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जात होती. सर्व काही व्यवस्थित असताना जावई अमोल याने कार घेण्यासाठी सोनालीला माहेरून दोन लाख रुपये मागून आण, असा तगादा लावला. दोन लाख रुपये देण्याएवढी वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे सोनाली पतीची समजूत काढत होती. दरम्यान, ती दोन लाखांची रक्कम (हुंडा) माहेरून आणण्यासाठी टाळत असल्यामुळे सोनालीचा छळ सुरू झाला. या पार्श्वभूमीवर, ९ सप्टेंबरच्या सायंकाळी ६.३० वाजता शंकरराव टिपले यांना अमोलचा फोन आला. सोनालीची प्रकृती खराब असून, तिला चांडक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे त्याने सांगितले. त्यावरून शंकरराव, त्यांची पत्नी कमलाबाई आणि मुलगा सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉस्पिटलमध्ये पोहचले. वैद्यकीय अहवालातून पाप उघडहे प्रकरण संशयास्पद वाटत असल्यामुळे ठाणेदार सत्यनारायण जयस्वाल यांनी डॉक्टरांना लगेच वैद्यकीय अहवाल मागितला. तो मिळताच पोलीसही हादरले. वकिली करणाऱ्या अमोलने एखाद्या सराईत गुन्हेगाराला लाजवण्यासारखे कृत्य केल्याचे उघड झाले. त्याने सोनालीच्या डोक्यावर आधी बॅट किंवा फळीचे फटके मारले. ती बेशुध्द झाल्यावर तिच्यावर विषप्रयोग केला. नंतर तिने विष घेतल्याचा कांगावा करून तिला रुग्णालयात दाखल केले. आपले पाप उघड होणार नाही, याची त्याला खात्री होती. मात्र, वैद्यकीय अहवालातून त्याचे पाप चव्हाट्यावर आले. ठाणेदार जयस्वाल यांनी त्याला, त्याच्या भावाला आणि आईला अटक करून त्यांची १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी मिळवली.प्र्रेयसीसाठी घेतला बळी ?आरोपी अमोलचे लग्नानंतर एका उच्चभ्रू तरुणीशी अनैतिक संबंध जुळले. त्यामुळे सोनालीचा खून करण्याचे कारस्थान रचल्याची प्राथमिक कबुली दिल्याचे पोलीस सांगतात. सोनालीच्या मृत्यूनंतर पे्रयसीशी घरठाव करण्याची त्याची योजना होती, असेही त्याने पोलिसांना सांगितल्याचे समजते. दरम्यान, एका वकिलाने केलेल्या या निर्दयी कृत्यामुळे पोलीसही हादरले आहे.