शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुटीबोरी-वर्धा राज्याचा नवा आर्थिक झोन, देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 04:18 IST

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टद्वारा संचालित सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्ट हा व्यवसायाच्या दृष्टीने वर्धावासीयांसाठी मैलाचा दगड आहे. या ड्राय पोर्टमुळे शेतक-यांच्या उत्पादनाला देशपातळीवरील बाजारपेठ मिळेल

वर्धा : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टद्वारा संचालित सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्ट हा व्यवसायाच्या दृष्टीने वर्धावासीयांसाठी मैलाचा दगड आहे. या ड्राय पोर्टमुळे शेतक-यांच्या उत्पादनाला देशपातळीवरील बाजारपेठ मिळेल. यामुळे बुटीबोरी आणि वर्धा हा राज्यमार्ग राज्याचा नवा आर्थिक झोन ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून सोमवारी सेवाग्राम येथे बहुप्रतीक्षित सेवाग्राम विकास आराखडा आणि सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्टचे रिमोट कंट्रोलने भूमिपूजन झाले. यावेळी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वित्तमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, खा. रामदास तडास, खा. अजय संचेती, खा. विकास महात्मे व अन्य मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा गांधी यांचे विचार देशाला देण्यासाठी असलेल्या सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामांना सुरुवात झाली असून यातून पर्यटनाला मोठी संधी मिळणार आहे. महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील लघु उद्योगाच्या विकासाची कास धरली जात आहे.वर्धा जिल्ह्यात महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी ५ हजार कोटी रुपयांच्या कामांना प्रारंभ झाला. या कामांतून जिल्ह्याची ओळख देशपातळीवर होणार आहे. हा कापूस उत्पादकांचा भाग असून येथे विलस्पीन नामक कंपनी कपाशीवर प्रक्रिया करणार आहे. या प्रकल्पातून शेतकºयांच्या मुलांच्या हाताला रोजगार देण्याचे महत्त्वाचे काम होणार आहे, असे गडकरी म्हणाले.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘संकल्प से सिद्धी’कडे जाताना सर्वसामान्यांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. देशाला स्वातंत्र्य देण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या वर्धेतून देशविकासाचा हा मंत्र दिला गेल्यास महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.वर्धा जिल्ह्यात होणाºया ड्राय पोर्टमध्ये केवळ वर्धेतील युवकांनाच रोजगार देण्यात येईल. या रोजगारासाठी युवकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वीकारावी.बाहेर जिल्ह्यातील युवकांना रोजगाराकरिता कोणताही नेता चिठ्ठी देणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.

टॅग्स :GovernmentसरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस