शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिओचा नवा धमाका, 1734 रुपयांत येणार जिओचा 4जी स्मार्टफोन

By admin | Updated: June 12, 2017 17:24 IST

दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवलेली रिलायन्स जिओ कंपनी ग्राहकांसाठी धमाकेदार 4जी फोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवलेली रिलायन्स जिओ कंपनी ग्राहकांसाठी धमाकेदार 4जी फोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स जिओ 4G VoLTEला सपोर्ट करणारा फोन लवकरच लाँच करणार आहे. विशेष म्हणजे या 4जी फोनची किंमत इतर स्मार्टफोनपेक्षा फारच कमी आहे. गॅझेट्स वेबसाइट 91 मोबाइल डॉट कॉमनुसार, या  रिलायन्स जिओ 4G VoLTE फोनची किंमत 1734 रुपये ते 1800 रुपयांपर्यंत असणार आहे. रिलायन्स जिओचा भारतातील गरिबातील गरीब ग्राहकापर्यंत सेवा पोहोचवण्याचा मानस आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रिलायन्स 4G VoLTE या मोबाईलचे दोन व्हेरिएंट्स लाँच करणार आहे. रिलायन्स जिओ या मोबाईलमध्ये Qualcomm आणि Spreadtrum प्रोसेसरचा वापर करणार आहे. Qualcomm प्रोसेसरच्या मोबाईलची किंमत 1734 रुपयांपर्यंत असणार आहे. Spreadtrum मोबाईलची किंमत 1800 रुपये असेल. रिपोर्टनुसार या मोबाईलचं प्रोडक्शनही सुरू करण्यात आलं आहे. रिलायन्स जिओ केवळ 1500 रुपयांच्या बाजारमूल्यात हा मोबाईल लाँच करणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती. मार्केट एक्सपर्ट्सनुसार, रिलायन्स जिओ सुरुवातीला सबसिडीच्या माध्यमातून या मोबाईलची विक्री करणार आहे. ग्राहकांची संख्या जास्तीत जास्त वाढवण्यासाठी रिलायन्स जिओ ही शक्कल लढवणार आहे. आतापर्यंत रिलायन्स जिओचे 10 कोटी युझर्स झाले आहेत. जिओच्या या नव्या 4G VoLTE स्मार्टफोनची स्क्रीन 2.4 इंच आहे. तसेच या मोबाईलमध्ये 512 एमबी रॅम देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी इंटर्नल मेमरी असेल.  4G VoLTE स्मार्टफोनला मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट करणार आहे. तसेच 2 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि व्हिजीए फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही वायफायही कनेक्ट करू शकता. तसेच 4G VoLTE या स्मार्टफोनमध्ये जीपीएस प्रणालीही बसवण्यात आली आहे. रिलायन्स जिओचं 5 कोटी हँडसेट बाजारात विकण्याचं लक्ष्य आहे. त्यामुळे लवकरच ग्राहकांना जिओचा स्वस्तातला मोबाईल मिळणार आहे.