शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

रस्ते कामाला नवे ठेकेदार

By admin | Updated: August 23, 2016 01:58 IST

दोषी ठेकेदारांना महापालिकेतच नव्हे तर सर्व सरकारी प्राधिकरणातूनही कायमचे हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली

मुंबई : रस्ते घोटाळ्यातील दोषी ठेकेदारांना महापालिकेतच नव्हे तर सर्व सरकारी प्राधिकरणातूनही कायमचे हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे़ त्याचवेळी पश्चिम उपनगरात डांबरी रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे़ त्यामुळे अखेर नवीन ठेकेदारांना संधी मिळणार असून या आला आहे़३५२ कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा उघड झाल्यानंतर रस्ते विभागात मोठ्या प्रमाणात सुरु असलेली अनियमितताही समोर आली होती़ याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर गेली वर्षोन्वर्षे पालिकेच्या प्रत्येक कंत्राटावर हात साफ करणाऱ्या सहा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला़ तरीही गेले काही दिवस या कारवाईचे भिजतं घोगडं ठेवणाऱ्या पालिकेला अखेर ठेकेदारांवर कारवाई करणे भाग पडले आहे़पोलिसांमार्फत कारवाई सुरु झाल्यानंतर आता पालिकेनेही सहा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु केली आहे़ ही कारवाई पुढच्या आठवड्यात पूर्ण होईल़ त्यामुळे रस्त्यांच्या नवीन कामांसाठी नव्या ठेकेदारांचा शोध सुरु झाला आहे़ पश्चिम उपनगरातील ४५ रस्त्यांच्या कामांसाठी ५४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर पावसाळा संपताच या कामाला सुरुवात होणार आहे़ (प्रतिनिधी)>अशी आहेत रस्त्यांची कामेरस्त्यांची झीज होणे, भेगा पडणे, विविध युटिलिटिज कंपनीमार्फत चर खणणे अशा कारणांमुळे प. उपनगरातील रस्ते खराब झाले. या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ५४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ अंधेरी पूर्वेला नऊ रस्ते, अंधेरी पश्चिम एक आणि कांदिवली पश्चिम २३ रस्त्यांचे काम पावसाळ्यानंतर सुरु होणार आहेत़ याचे काम मे़ देवा इंजिनिअर्सला तर खार, वांद्रे आणि अंधेरी पूर्व येथील काही रस्त्यांचे काम मेसर्स कोनार्क स्ट्रक्चरल इंजिनिअर्सला देण्यात आले आहे़> नवीन ठेकेदारांची कमी बोलीगेल्या काही वर्षांमध्ये ठेकेदारांची मक्तेदारी प्रस्थापित झाल्यामुळे त्यांची मुजोरीही वाढली होती़ त्यामुळे जादा बोली अथवा कंत्राटाच्या एकूण किंमतीपेक्षा ५० ते ६० टक्के कमी बोली ठेकेदार लावत होते़ ज्यामुळे खर्च १०० रुपये असेल तर ६० रुपये ठेकेदार खर्च करीत असल्याने कामाच्या दर्जेबाबतही साशंकता निर्माण होत होती़ कामं निकृष्ट दर्जाची केली जात असल्याचेही समोर आले आहे़ मात्र या कामासाठी मे़ देवा इंजिनिअर्सने १५ टक्के कमी बोली लावली आहे़ अन्य रस्त्यांच्या कामासाठी मे़ कोनार्क स्ट्रक्चल इंजिनिअर्सने १३़६८ टक्के कमी बोली लावली आहे़>दुसऱ्या अहवालाच्या प्रतीक्षेतदक्षता खात्याचे प्रमुख अभियंता एसक़ोरी यांच्या अध्यक्षतेखाली २२६ रस्त्यांची चौकशी सुरु आहे़ पहिला चौकशीचा अहवाल सादर केल्यानंतर दुसरी फेरी तत्काळ सुरु झाली़ त्यानुसार रस्त्यांची पाहणीही करण्यात आली़ मात्र अद्याप अहवाल सादर झालेला नाही़ दक्षता खात्याला याबाबत वारंवार सुचना करुनही अहवाल सादर करण्यात आलेला नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़>सार्वजनिक पैशांची नासाडी३५२ कोटींचा घोटाळा ही सार्वजनिक पैशांची नासाडी असून निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस चौकशी समितीने पहिल्या फेरीच्या अहवालातून केली होती़यांच्यावर झाली कारवाईरस्ते विभागाचे प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांचे निलंबन व अटक, थार्डपार्टी आॅडिट कंपनीच्या २२ अभियंत्यांना अटक, के़आऱ कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा, आरपीएस, आऱ के़ मदानी, जे़ कुमार, रेलकॉन या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकाणे, नोंदणी रद्द करणे व त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रारीची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली़ आतापर्यंत तीन ठेकेदारांना अटक झाली आहे़