शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

७.५ अश्वशक्तीचे नवीन ७५०० सौर कृषी पंप आस्थापित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 09:34 IST

महावितरणकडून विशेष वेबपोर्टलद्वारे कृषी पंपांसाठी आॅनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अकोला : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ७.५ अश्वशक्तीचे ७,५०० नवीन सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार महावितरणकडून विशेष वेबपोर्टलद्वारे कृषी पंपांसाठी आॅनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे याकरिता राज्य शासनाने १ लाख पारेषण विरहित सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना’ सुरू केली आहे. महावितरणच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यात २५ हजार सौर कृषी पंपांच्या आस्थापनेचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. आता दुसºया व तिसºया टप्प्यात आणखी ७५ हजार सौर कृषी पंपांच्या आस्थापनेचे उद्दिष्ट आहे. तथापि, शेतकºयांची मागणी लक्षात घेता ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी या योजनेच्या टप्पा २ व ३ अंतर्गत ७.५ अश्वशक्तीचे ७,५०० सौर कृषी पंप आस्थापित करण्याकरिता मंजुरी दिलेली आहे.महावितरणकडून वेबपोर्टलद्वारे ७.५ अश्वशक्तीच्या सौर कृषी पंपांच्या आस्थापनेसाठी आॅनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, ज्या गावांची सुरक्षित पाणलोट क्षेत्रांची उपशाची स्थिती ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहिरींमध्ये व कूपनलिकांमध्ये नवीन ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषी पंप देण्यात येणार आहे; मात्र कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये ६० मीटरपेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये ७.५ अश्वशक्तीचे सौर पंप देण्यात येणार नाही. अर्ज करण्यासाठी शेतकºयांनी महावितरणच्या ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल/२ङ्म’ं१/ या वेबपोर्टलला भेट देण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. तसेच या योजनेसंबंधी सर्व माहिती या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे.केवळ १० टक्के लाभार्थी हिस्सासदर योजनेंतर्गत सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थींकडून १० टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित जमातीच्या लाभार्थींकरिता ५ टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थीस भरणे आवश्यक आहे. ७.५ अश्वशक्ती सौर कृषी पंपाची ८.९ टक्के जीएसटीसह किंमत ३,३४,५५० असून, खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना १० टक्के हिस्सा म्हणून ३३,४५५ रुपये केवळ तर अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थींना ५ टक्के हिस्सा म्हणून १६,७२८ रुपये केवळ भरणा करावा लागेल.

 

टॅग्स :AkolaअकोलाNitin Rautनितीन राऊतmahavitaranमहावितरण