शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस यांच्याबद्दल कधीही कोणती गोष्ट गुपचूपपणे सांगितली नाही- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 08:34 IST

खाेडसाळ राजकारण करू नये

नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कधीही कोणती गोष्ट गुपचूपपणे सांगितलेली नाही. विजय वडेट्टीवार यांनी अशी बेजबाबदार वक्तव्ये करून खोडसाळ राजकारण करू नये, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले.गडकरी यांनी फडणवीस यांच्याविरोधात महत्त्वाची बाब गुपचूपपणे सांगितली, असा दावा वडेट्टीवार यांनी केला होता. यावर गडकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्याची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णत: निराधार व तथ्यहीन आहे. फडणवीस हे भाजपातील महत्त्वाचे नेते आहेत व माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. एकमेकांविरोधात कारस्थान करणे व एकमेकांची जिरविणे, ही काँग्रेसची परंपरा आहे. काँग्रेसचे मंत्री भाजपमध्येदेखील असा प्रकार करू पाहात आहेत, असा आरोप गडकरी यांनी केला. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राज्याची प्रगती झाली. विरोधी पक्षनेते म्हणूनदेखील चांगले कार्य करत असून, महाविकास आघाडी सरकारच्या चुकांवर नेमके बोट ठेवत आहेत. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी काँग्रेसला कुणीच भाव देत नाही व त्यामुळे त्यांच्या नेत्यांमध्ये नैराश्य आहे. चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसचे नेते बेजबाबदार वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावादेखील गडकरी यांनी केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार