शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

मंदिरात महिला पुजारी नसणे हे दुर्दैैवी - तृप्ती देसाई

By admin | Updated: March 13, 2016 01:47 IST

महिलांमध्ये लढाऊ वृत्ती ही तयार होत नसते, तर ती प्रत्येकात असते. ती फक्त पुढे आणावी लागते. आंदोलने ही हक्कांसाठी असतात. आम्ही आंदोलने करतो ते कोणत्याही देवाविरोधी किंवा धर्माविरोधी नाही

पुणे : महिलांमध्ये लढाऊ वृत्ती ही तयार होत नसते, तर ती प्रत्येकात असते. ती फक्त पुढे आणावी लागते. आंदोलने ही हक्कांसाठी असतात. आम्ही आंदोलने करतो ते कोणत्याही देवाविरोधी किंवा धर्माविरोधी नाही, तर ती समानतेच्या हक्कांसाठी असतात. देवीच्या मंदिरात महिला पुजारी नसणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी खंत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली.सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३ डी २ तर्फे विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजविणाऱ्या ११ महिलांना स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार आरती कदम, लायन्स क्लब ३२३ डी २ चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर श्रीकांत सोनी, चंद्रहास शेट्टी, राजेंद्र गोयल, क्लबच्या शैलजा सांगळे, नीता शहा, जयश्री पेंडसे, सुनीता शिर्के उपस्थित होते.संध्या देवरुखकर यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री पेंडसे यांनी प्रास्ताविक केले. सुनीता शिर्के यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)सोनल दरवडे, जाई खामकर, अंबू गोविंदगिरी, प्रतिभा डेंगळे, शोभना मंत्रिवादी, उषा राऊत, अनुराधा जाधव, ज्योती पुंडे, सुखदा साने, हर्षा शहा, डॉ. राजश्री महाजनी यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘‘अनेक महिला आजही त्यांच्या हक्क आणि अधिकारांपासून अनभिज्ञ आहेत. महिलांना एकविसाव्या शतकात समानतेसाठी रस्त्यावर उतरावे लागत, आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आमचे हक्क आम्हाला मिळाले तर कोणत्याही आंदोलनाची गरज पडणार नाही.’’श्रीकांत सोनी म्हणाले, ‘‘भारतात आजही पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे. तरीही आज अनेक क्षेत्रे अशी आहेत, जिथे महिलाच सरस आहेत.’’आरती कदम म्हणाल्या, ‘‘पत्रकार हा समाजामध्ये माध्यम म्हणून काम करीत असतो. समाजात सकारात्मक बाबी दाखवून तो आशा जागृत ठेवतो.’’