जयाज्योती पेडणोकर - मुंबई
व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरू असलेल्या ओळख परेडदरम्यान नेहा नाईक हिने आपण भारतातून आल्याचे सांगताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराम ओबामा यांनी तिच्याशी हस्तांदोलन केले. ‘भारतातल्या कुठल्या भागातून..’ असा प्रश्न ओबामांकडून येताच तिने मुंबई, असे सांगितले आणि उपस्थित असलेल्या मिशेल ओबामा यांनी तिला घट्ट मिठी मारली. याच मिठीने नेहा भारावून गेली.
2क्13 साली कोरियामध्ये झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये मुंबईच्या नेहा नाईक हिला भारताची अॅम्बेसेडर म्हणून निवडले होते. तिने या संधीचे सोने केले. विशेष मुलांच्या गरजा आणि आपली जडणघडण याबाबत तिने ऑलिम्पिक्समध्ये जे भाषण केले त्यामुळे तिची निवड ‘इंटरनॅशनल ग्लोबल मॅसेंजर’ म्हणून केली. याच वेळी तिच्यासोबत अन्य देशांतील अकरा मुलांचीही ‘इंटरनॅशनल ग्लोबल मॅसेंजर’ म्हणून निवड केली. याच 12 जणांना ओबामांनी 31 जुलै रोजी जेवणाचे आमंत्रण दिले होते. मागील आठवडाभर नेहा वॉशिंग्टन येथे होती. 31 जुलैची नेहा आतुरतेने वाट पाहत होती. आणि तो दिवस उजाडल्यानंतर ओळख परेड सुरू असताना तिने बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांना पाहिले आणि तिची स्पंदने वाढली. ओबामा यांच्यासोबत फारसा काही संवाद झाला नाही आणि जो झाला त्यादरम्यान आम्हाला आकाश ठेंगणो झाले होते. ओबामा यांची झालेली भेट विसरणो शक्य नाही, असे नेहाने ‘लोकमत’ला सांगितले.