मुंबई : विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात अनेक ठिकाणंी अमली पदार्थांचे अड्डे आहेत. मात्र स्थानिकांनी याबाबत तक्रारी करुनही पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अड्डयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.विक्रोळी येथे अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, त्या पिडीत मुलीच्या कुटुंबियांची निरुपम यांनी रविवारी राजावाडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी कुटुंबियांना मदतीचे आश्वासन देतानाच अंमली पदार्थांच्या विरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला. अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणारा आरोपी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. पार्कसाईट विभागात अनेक अमली पदार्थांचे अड्डे आहेत. नागरिकांनी वेळोवेळी याविरोधात पोलिस स्टेशन मध्ये तक्रारी केल्या होत्या. अमली पदार्थांचे अड्डे बंद करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे गुन्हेगारांची भीड चेपली गेली आहे. तसेच गर्दुल्ल्यांचा त्रासही वाढला आहे. पोलिसांनी ताबडतोब विक्रोळीह मुंबईती अमली पदार्थांचे अड्डे उध्वस्त करावेत अन्यथा मुंबई काँग्रेच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संजय निरुपम यांनी दिला. तसेच बलात्कार प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही केली. (प्रतिनिधी)>मुख्यमंत्र्यांची भेट घेणारमुंबईत ड्रग्जचा व्यापार वाढत आहे. मुंबईत छुप्या मार्गाने येणारी गर्द रोखली जावी आणि गर्दुल्यांचे वाढते अड्डे उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सांगितले.विक्रोळी येथील अडीच वर्षीय बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची रामदास आठवले यांनी रविवारी भेट घेतली. या वेळी रिपब्लिकन पक्षातर्फे पीडित मुलीच्या परिवाराला तातडीने ५० हजारांच्या मदतीची घोषणाही आठवले यांनी केली. मुंबईसारख्या महानगरातील युवापिढी ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे. गर्दुल्ल्यांची संख्या आणि त्यांच्या गुन्ह्यांची यादी वाढत असल्याचा आरोपही आठवले यांनी केला. विक्रोळीत २ वर्षांच्या कोवळ्या मुलीवर झालेला बलात्कार ही अत्यंत अमानवीय घटना आहे. अशा गुन्हेगारांवर कठारे कारवाई व्हायला हवी, असेही आठवले म्हणाले.>देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई आता ड्रग्ज् राजधानी म्हणून गाजू लागली आहे. अनेक भागात खुलेआम चालणा-या ड्रग्ज्रच्या व्यवसाताबाबत ‘लोकमत’ने ६ फेब्रुवारी रोजी विशेष स्टिंग आॅपरेशन केले होते. यात सर्रास होणारी विक्री थांबवावी तसेच दोषींवर कठारे कारवाई करण्याची मागणी केली होती.
ड्रग्जच्या अड्ड्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष
By admin | Updated: August 15, 2016 05:09 IST