शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बाजारबुणगे अन् शिवसैनिकांमध्ये फरक; नीलम गोऱ्हेंचा शिंदे गटाला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2022 14:51 IST

दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाकडून शासकीय यंत्रणेचा वापर, पंढरपुरात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा आरोप

पंढरपूर - शासकीय यंत्रणेचा फायदा घेऊन दसरा मेळाव्याला शिंदे गट गर्दी करणार असल्याचे मत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला येणारे लोक हे मनाने येतात. इतर मेळाव्यात कोणी कितीही लोकांच्या संख्येचे दावे करू देत पण बाजारबुणगे आणि शिवसैनिक यामध्ये फरक आहे असा टोला त्यांनी लगावला. 

विठ्ठलाच्या दर्शनासाठी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे या पंढरपूर येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, लोक मनाने आलेले असावेत. आणलेली नसावेत, पळून जाण्याच्या पवित्र्यात नसावीत. कायद्याच्या भीतीने, इडीच्या भीतीने, सीबीआयच्या भीतीने आले नसावेत. पोलिसांनी तडीपारचे आदेश काढलेल्या भीतीने आलेले सैनिक नसावेत. शिवसेना गट सोडून गेलेल्या आमदारांनी मंत्री पद मिळणार म्हणून सचिव, ड्रायव्हर शोधून ठेवले होते. अधिकाऱ्याची बदली करण्याची तयारी करून ठेवली होती. पेढे आणून ठेवले होते. परंतु त्यांचं काय झालं त्यांना काहीच मिळाल नाही अशी खिल्ली देखील शिंदे गटातील आमदारांची गोऱ्हे यांनी उडवली आहे.

भाजपापासून दूर होणे योग्यच शिवसेनेने भाजपाची युती तोडली. त्यावेळी भाजपाचे नेते पाठीत खंजीर खुपसला असे म्हणत होते. परंतु १५५ आमदार निवडून आणण्याची तयारी भाजपने ठेवली होती. ते त्यांनी शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठीच तयारी केली होती. त्यामुळे शिवसेनेने घेतलेला निर्णय योग्य होता असे गोऱ्हे यांनी सांगितले.

राम कदम यांनी जावई शोध कोठून काढला दसरा मेळावा गर्दी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीचे मदत घेतल्याची आमदार राम कदम यांनी केले होते. यावर आ. राम कदम हरिश्चंद्र आहेत का ? त्यांच्याकडं काही पुरावा आहे का ? खोटे बोलून ठाकरे यांची लोकप्रियता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागाई वाढली आहे. स्वतः च अपयश झाकण्यासाठी ते चुकच्या टीका करत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

रामदास कदमंच्या विधानाचा शोध घेण्यासाठी सत्यशोधक समिती नेमण्याची गरजशिवसेनेचे आणखी पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी सांगितली होती.रामदास कदम यांचे विधानाचा शोध घेण्यासाठी सत्यशोधक समिती नेमण्याची गरज असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNeelam gorheनीलम गो-हे