शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील गरजवंतांची आधार ‘कपडा बँक’

By admin | Updated: October 24, 2016 05:27 IST

नागरिक इच्छेने वापरात नसलेले चांगले कपडे देतात आणि ज्याला गरज आहे असे गोरगरीब नावे नोंदवून

नाशिक : नागरिक इच्छेने वापरात नसलेले चांगले कपडे देतात आणि ज्याला गरज आहे असे गोरगरीब नावे नोंदवून आवश्यकतेनुसार कपडे घेऊन जातात. ‘जॉय आॅफ गिव्हिंग’ संकल्पनेतून चालणाऱ्या ‘कपडा बँके’मुळे गरजू लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. रोटरी क्लब आॅफ नाशिक ईस्टने जेलरोडवरील सेंट फिलोमिना शाळेसमोर पाच आठवड्यांपूर्वी सुरू केलेल्या या बँकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन कपडे खरेदी करताना, वापरात नसलेले कपडे या बॅँकेत देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पाच आठवड्यांत सुमारे ११ ते १२ हजार कपड्यांचे वाटप करण्यात आले आहे.साधारणत: वापरलेले, परंतु सुस्थितीत असलेले कपडे फेकून न देता, रोटरीकडे जमा करण्याचे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले होते, अशी माहिती डॉ. मनोज कलंत्री यांनी दिली. जिल्हाभरातून कपडा बँकेत कपडे जमा होत असून, दान म्हणून मिळालेले कपडे स्वच्छ धुऊन आणि इस्त्री करून ठेवले जातात. गरजूंनी नाव नोंदविल्यावर ते त्यांना सुपूर्द केले जातात. रोटरी नाशिक ईस्टचे अध्यक्ष डॉ. मनोज कलंत्री आणि शासकीय संदर्भ रुग्णालयातील डॉ. विद्यासागर बाहेती यांना कपडा बँकेची कल्पना सुचली. त्यांना संजय अग्रवाल यांनी जागा वापरण्यासाठी दिली. या प्रकल्पाचे अध्यक्ष अतुल मलानी, डॉ. प्रशांत भुतडा आदींच्या सहकार्यातून बँकेला मूर्त रूप आले.