शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

‘डॉक्टर-रुग्ण संवादाची गरज’

By admin | Updated: June 1, 2014 01:00 IST

दुरावा दूर करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवादाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलपती जितेंद्र आव्हाड यांनी केल़े

नाशिक : जन्म आणि मृत्यूची बातमी सर्वप्रथम डॉक्टरच देतात़ डॉक्टरांप्रति रुग्णांच्या असलेल्या विश्वासामुळेच फॅ मिली डॉक्टर ही संकल्पना अस्तित्वात आली़ मात्र ही संकल्पना आता लोप पावत चालली आह़े डॉक्टरांच्या हातात विश्वासाने हात देणारे रुग्ण कमी झाले असून, या नात्यात दुरावा निर्माण झाला आह़े हा दुरावा दूर करण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवादाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलपती  जितेंद्र आव्हाड यांनी केल़े महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 13 व्या दीक्षान्त समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होत़े यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 47 विद्याथ्र्याना सुवर्ण पदके तर 671क् विद्याथ्र्याना पदवी प्रदान केल्याचे जाहीर करण्यात आल़े मुंबईच्या जी़ एस़ मेडिकल कॉलेजच्या शेफ ाली पारीख या विद्यार्थिनीने 12 सुवर्ण पदके आणि एक रोख पारितोषिक मिळविल़े 
आव्हाड पुढे म्हणाले की, स्वप्न बघणो हा मानवी स्वभावाचा एक भाग असून ती प्रत्येकाने बघितली पाहिजेत. मुलांनी केलेल्या स्वप्नपूर्तीचा आनंद आई-वडिलांच्या चेह:यावर स्पष्टपणो बघायला मिळतोय़ मलेरिया, टॉयफ ाईड यापेक्षाही डायबिटीसने मृत्यू पावणा:याची संख्या जास्त असून, यासाठी काही शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करणो,  विद्यार्थी, शिक्षक यांच्यावरील ताण-तणाव दूर करण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट कोर्सेस यासाठी प्रयत्न करणो गरजेचे आह़े रिक्त पदे भरण्याचा निर्णयही सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या विद्याथ्र्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे त्यांनी भावी काळात आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपण दुस:याच्या डोळ्यात अश्रू तर आणत नाही ना याची जाणीव ठेवण्याची गरज असल्याचेही आव्हाड म्हणाल़े 
संशोधन ही एक निरंतन वैचारिक प्रक्रिया असून, जीवनात पुढे जाण्यासाठी स्वार्थीपणाचा अवलंब न करता सर्वाना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा़, असेही कटोच यांनी सांगितल़े
दीक्षान्त समारंभाचे अतिथी व मध्य प्रदेश वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ डी़पी़ लोकवाणी यांनी सांगितले की, पैशाच्या मागे लागून डॉक्टरांनी आपल्या मूल्यांशी प्रतारणा करता कामा नय़े पैसे हे सर्वस्व नसून आपण सरस्वतीचे पूजक आहोत. सरस्वतीची उपासना केली की लक्ष्मी आपोआप मिळत असल्याचे डॉ़ लोकवाणी यांनी सांगितल़े आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ अरुण जामकर यांनी यावेळी विद्यापीठाच्या प्रगतीचा तसेच विविध सामाजिक उपक्र मांचा आढावा घेतला़ यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ़ काशीनाथ गरकळ, 
प्र-कुलगुरू डॉ़ शेखर राजदेरकर आदिंसह विविध शाखांचे डीन उपस्थित होत़े (प्रतिनिधी)
 
वैद्यकीय शाखानिहाय पदवीप्राप्त विद्याथ्र्याची संख्या
आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवी - 2661, पदव्युत्तर पदवी - 15क्, दंत वैद्यक विद्याशाखा -415, पदव्युत्तर - 15, आयुव्रेद विद्याशाखा - 1124, आयुव्रेद पदव्युत्तर -3क्1, युनानी विद्याशाखा - 125, पदव्युत्तर विद्याशाखा - 5, होमिओपॅथी विद्याशाखा - 959, पदव्युत्तर - 53, बी़पी़टी़एच. -369, बी़ओ़टी़एच. - 34, बीएएसएलपी - क्4, बी़पी़ओ. - 16, बेसिक बी़एस्सी नर्सिग -222, पी़बी़बी़एस्सी - 26, बी़पी़एम़टी. -19, पी़जी़ डिप्लोमा मेडिकल लॅबोटरी अॅण्ड टेकAॉलॉजी - 35, पी़ जी़ डिप्लोमा - 22, डिप्लोमा इन ऑप्थोल्मॉलॉजी सायन्स - 7, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री - 1, मास्टर ऑफ  सायन्स - 1क्, एम़ए़एस़एल़पी. -  6, एम़एस़सी. नर्सिग - 31, एम़पी़टी़एच. - 3, एम़ओ़टी.एच. - 3, पीएचडी - 8, एम़बी़ए. - 56 अशा एकूण 671क् विद्याथ्र्याना पदवीका, पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त झाली आह़े