शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बसपा-रिपाइंच्या ऐक्याची गरज , मायावतींनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 03:31 IST

समाज म्हणून सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन डावपेच आखले पाहिजेत व एक निर्णायक राजकीय शक्ती निर्माण केली पाहिजे. बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षांचे

औरंगाबाद : समाज म्हणून सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन डावपेच आखले पाहिजेत व एक निर्णायक राजकीय शक्ती निर्माण केली पाहिजे. बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षांचे ऐक्य होऊन मायावतींनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं (ए)चे राष्ट्रीयअध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली.सुभेदारी गेस्ट हाउसमध्ये रामदास आठवले पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बाबासाहेबांचे नातू म्हणून आम्हाला आदरच आहे. माझ्या मंत्रिपदाबद्दल त्यांना आदर आहे की नाही, माहीत नाही, पण बाळासाहेबांनी अकोला पॅटर्न राबवून बाबासाहेबांच्या स्वप्नातले राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी ऐक्याच्या प्रक्रियेत यावे, त्यांचे नेतृत्व मानायला मी तयार आहे.आम्ही रा. स्व. संघासोबत नाहीत. आम्ही भाजपाबरोबर, नरेंद्र मोदींबरोबर आहोत. नरेंद्र मोदी संविधानाला धर्मग्रंथ मानतात. त्यामुळे संविधान बदलले जाण्याची आम्हाला सुतराम शक्यता वाटत नाही. त्या केवळ वावड्या आहेत, असे आठवले म्हणाले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, गुजरातमध्ये मुस्लीम आणि दलित काँग्रेसच्या बाजूने नाहीत. पाटीदार समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याच्य्२ाा आम्ही विरोधात आहोत.सुब्रमण्यम स्वामी व संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याकडे आठवले यांचे लक्ष वेधले असता, मिश्कीलपणे ते म्हणाले की, राहुल गांधी हुशारच आहेत. हल्ली ते भाजपावर जोरदार टीका करीत असतात, पण राहुल गांधींपेक्षा उद्धव ठाकरे मला जास्त हुशार वाटतात.शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी दलित योजनांचे पाचशे कोटी रुपये महाराष्टÑ शासनाने वळविल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत, आठवले यांनी या संबंधीचा कायदा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :mayawatiमायावतीRamdas Athawaleरामदास आठवले